आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 21 Universities Are Fraud In India, UGC Has Declared List

देशात 21 विद्यापीठ बनावट: UGC ची लिस्ट जाहीर, नागपुरातील विद्यापीठाचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील एकूण 21 विद्यापीठ बनावट आहेत. या विद्यापिठांमध्ये प्रवेश घेऊन नका, असे सांगून युजीसीने वेबसाईटवर याची यादी जाहीर केली आहे. या विद्यापिठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारी डिग्री मान्यताप्राप्त राहणार नाही, असे सांगण्यात आले आहे. देशातील 9 राज्यांमध्ये हे 21 विद्यापीठ आहेत. यातील सर्वाधिक 9 बनावट विद्यापीठ उत्तर प्रदेशात आहेत. नागपूरमध्येही एक असे विद्यापीठ आहे, ज्याला मान्यता नाही.
दिल्ली - कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दरियागंज
यूनाइटेड नेशन्स युनिव्हर्सिटी
व्होकेशन युनिव्हर्सिटी
एडीआर-सेंट्रिक ज्यूरिडिकल युनिव्हर्सिटी, एडीआर हाउस
इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायंस अॅण्ड इंजीनिअरिंग
बिहार : मैथिली युनिव्हर्सिटी, दरभंगा
कर्नाटक : बडागानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसाइटी, बेळगाव
केरळ : सेंट जॉन, कृष्णट्‌टम
तमिलनाडू : डीडीबी संस्कृत युनिव्हर्सिटी, पुत्तुर, त्रिची
पश्चिम बंगाल : इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकाता
उत्तरप्रदेश : वाराणसेय संस्कृत युनिव्हर्सिटी, वाराणसी यूपी/ जगतपुरी, दिल्ली
महिला ग्राम विद्यापीठ/युनिव्हर्सिटी, अलाहाबाद
गांधी हिंदी विद्यापीठ, अलाहाबाद
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कम्प्लेक्स होमियोपॅथी, कानपूर
नेताजी सुभाषचंद्र बोस युनिव्हर्सिटी (ओपन युनिव्हर्सिटी), अचलताल, अलीगड
उप्र युनिव्हर्सिटी, मथुरा
महाराणा प्रताप शिक्षा निकेतन युनिव्हर्सिटी, प्रतापगड
इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद, इंन्स्टिट्युशनल एरिया, खोडा माकनपूर, नोएडा
गुरुकुल युनिव्हर्सिटी, वृंदावन, मथुरा

महाराष्ट्र : राजा अरेबिक युनिव्हर्सिटी.