आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन की बात : दोन कोटींचे बंगले, उत्पन्न, ५० लाख- ३० सप्टें.पर्यंत जाहीर करा अघोषित उत्पन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच स्वत:च्या नव्हे, तर सरकारच्या ‘मन की बात’ बोलून दाखवली. कार्यक्रमात नेेहमी सामाजिक बदलावर बोलणारे मोदी रविवारी राजकारण, परराष्ट्र धाेरण आणि आर्थिक धोरणांवर बोलले. वाढत्या करबुडवेगिरीची शंका उपस्थित करून मोदी म्हणाले, ‘सव्वाशे कोटींच्या देशात फक्त दीड लाख लोकांचे करपात्र उत्पन्न ५० लाख रुपयांवर आहे यावर विश्वासच बसत नाही. खरे तर मोठ्या शहरांतील लाखो लोकांचे एक-दोन काेटींचे बंगले आहेत. याचा अर्थ काहीतरी गडबड नक्की आहे.’

कर बुडवणाऱ्यांना मोदींनी अल्टिमेटमही देऊन टाकला. ते म्हणाले, काळा पैसावाल्यांना एक संधी आहे. अघाेषित उत्पन्न जाहीर करा. ३० सप्टेंबरपर्यंत दंड भरून ओझे उतरवून टाका. असे केल्यास आम्ही तुमची कोणतीही चौकशी करणार नाही. ही शेवटची संधी आहे. नंतर मात्र मागे शुक्लकाष्ठ लागू शकते आणि तेव्हा आम्ही कोणतीही मदत करू शकणार नाहीत.
३० सप्टेंबरनंतर संभाव्य कारवाई
करचोरांचे पॅन कार्ड ब्लॉक होऊ शकते. त्यांची गॅस सबसिडी बंद होऊ शकते. अशा लोकांना कर्ज देण्याची बँकांना सूचना. प्रत्येक सुविधेसाठी आयटी खात्याची मंजुरी लागेल.मोठ्या थकबाकीदारांची नावे सार्वजनिक होतील. मालमत्ता जप्त करण्यापासून अटकही शक्य. (अर्थ खात्याच्या सूत्रांनुसार)

‘मन की बात’ची थट्‍टा उडवली जातेय...
- मोदी म्हणाले की, 'मन की बात'ची थट्टा उडवली जात आहे.
- भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात आजच्या दिवशी अर्थात 26 जून 1975 रोजी काळी रात्र आली होती.
- जेपी, लोहियासह अनेक नेत्यांना आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकण्यात आले होते.
- आणीबाणीमध्ये देशातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.
- लोकशाही म्हणजे जनतेची भागिदारी आहे. लोकसहभागातून देशाची प्रगती व्हायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.
- टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून Mygov वर सुमारे 3 लाख लोकांनी सरकारचा रिव्ह्यू केला आहे.
- जनतेचे मंत्र्यांच्या कामाचे मुल्यांकन करावे, असे अावाहनही मोदींनी केले आहे.
- योगविषयक अनुभव #YogaFightsDiabetes या हॅशटॅगसह सोशल मीडियावर किंवा NarendraModiApp वर पाठवण्याचे मोदींनी देशातील जनतेला आवाहन केले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, कोण-कोणत्या मुद्द्यावर बोलले मोदी...?
बातम्या आणखी आहेत...