आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज येथे झालेल्या चेंगराचेंगरीत भारतीय मृतांचा आकडा 22 वर, एकूण 769 मृत्यूमुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/मीना- सौदी अरेबियात हज यात्रेत सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेदरम्यान उसळलेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या ७६९ वर पोहोचली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून ही माहिती दिली. अद्याप काही मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, मृतांची ओळख पटलेल्यांत रसूल अली (झारखंड), मोईनुद्दीन (यूपी), हाफुआशबेन सातरशा दिवान आणि सय्यद अब्दुल हुसेन (दोघेही गुजरात) यांचा समावेश आहे. आधी १४ भारतीयांच्या मृत्यूचे वृत्त होते.
महाराष्ट्राच्या एकाचा मृत्यू
भारतीय हज मिशनने सांगितले की, मृतांत ११ गुजरात, ३ तामिळनाडू, ३ झारखंड तसेच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रच्या प्रत्येकी एका यात्रेकरूचा समावेश आहे. जखमींत लक्षद्वीप, आसाम, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, बिहार, ओडिशा, केरळ आणि उत्तर प्रदेशच्या प्रत्येकी एका तर पश्चिम बंगाल व जम्मू-काश्मीरच्या दोन यात्रेकरूंचा समावेश आहे. मीनामध्ये गुरुवारी सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेदरम्यान झालेल्या चंेगराचेंगरीत ७६९ यात्रेकरूंचा मृत्यू, झाला, तर ८५० पेक्षा जास्त भाविक जखमी झाले होते.