आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 25 Member Of Parliament Suspend From Lokshbha Congress Will Strong Protest Aginst

दिल्लीपासून गल्लीपर्यंत कॉंग्रेसचा एल्गार, संजय निरुपम पोलिसांच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धरणे आंदोलन करताना सोनिया गांधी - Divya Marathi
धरणे आंदोलन करताना सोनिया गांधी
नवी दिल्ली- 25 खासदारांवर केलेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात काँग्रेसने एल्गार सुरु केला आहे. दिल्लीत काँग्रेसच्या नेत्याचा संसदेबाहेर धरणे आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे, काँग्रेस खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंबईतील हुतात्मा चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षसंजय निरुपम यांना काही कार्यकर्त्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

दिल्लीत संसदेसमोर सुरु केलेल्या धरणे आंदोलनात स्वत: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसचे नेत्यांना काळ्या पट्ट्या बांधून मोदी सरकारचा निषेध केला आहे. कॉंग्रेसच्या आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

कॉंग्रेसच्या 25 खासदारांवर झालेल्या निलंबनाची कारवाईच्या विरोधात कॉंग्रेससह इतर विरोधी पक्ष एकवटल्याचे दिसून आले होते. मात्र, संसदेबाहेर धरणे आंदोलन करताना फक्त कॉंग्रेसचेच खासदार दिसत आहेत. संसद कामकाज सुरु असताना कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षानी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. खासदारांचे निलंबन मागे घेतले जात नाही, तोपर्यंत कामकाजात सहभागी होणार नसल्याचा पवित्रा कॉंग्रेससह इतर पक्षाच्या खासदारांनी घेतला आहे.

संसद चालवणे ही सरकारची जबाबदारी, खासदारांचे निलंबन करुन सत्ताधा-यांनी लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप सोनिया गांधी

कॉंग्रेससह इतर पक्ष पुढील पाच दिवस एनडीए सरकारविरुद्ध आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या आंदोलनात निलंबित खासदारांनी सहभाग घेतला आहे.

सोमवारचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस होता. मोदी सरकारकडून लोकशाहीची हत्या होत असल्याचेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी देशातील जनतेच्या मनातील ऐकावे, असा टोला राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सुषमा स्वराज यांनी राजीनामा द्यावा, असे संपूर्ण देशातील जनतेला वाटत असल्याचे राहुल यांनी यावेळी म्हटले आहे आता आम्ही सत्ताधार्‍यांसमोर नमते घेणार नाही, आम्हाला संसदेतून बाहेर काढला तरी चालेल पण आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, मायावती यांनी देखील भाजप सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय दुर्दैवी असून त्यावर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे
मायावतींनी म्हटले आहे.

दुसरीकडे, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हा नाइलाज असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय लोकशाहीत धडा घेण्याचा दिवस म्हणून गणला जावा, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, संसदेतील संघर्ष शिगेला पोहोचल्यानंतर सोमवारी लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या 44 पैकी 25 'गोंधळी' खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे. विरोधकांवरील सरकारचा अशा प्रकारचा राग लोकसभेत 26 वर्षांनंतर दिसला आहे. यापूर्वी ठक्कर आयोगाच्या अहवालावरून गोंधळ झाल्यामुळे 15 मार्च 9189 रोजी 63 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हा केंद्रात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे सरकार होते.

वाचा, कोण काय म्हणाले...
'आईवडिलांची हत्या केल्यानंतर मी अनाथ झालो, असे ओरडणार्‍यांसारखी सध्या काँग्रेसची अवस्था झाली आहे. त्यांनीच लोकशाहीची हत्या केली व आता तेच ओरडत आहेत.'
- मीनाक्षी लेखी, भाजप नेत्या

'भाजपाला मिळालेला जनादेश काँग्रेसच्या पचनी पडत नाहीये, काँग्रेस जनादेशाचा अपमान करत आहेत. काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणामुळे देशाच्या विकासात अडथळे येत आहेत, भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीत यावर नाराजी व्यक्त करण्यात आली '
-मुख्तार अब्बास नकवी
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोण काय म्हणाले...