आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील फळबागांसाठी केंद्राचा 256 कोटींचा निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फळबागांसाठी केंद्र सरकार 256 कोटी अतिरिक्त मदत देणार आहे. कृषिमंत्री शरद पवारयांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळावरील मंत्रिगटाची बुधवारी बैठक झाली. यात या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. बैठकीनंतर शरद पवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, पशुखाद्यावर शुल्क रद्द करण्याचा प्रस्तावही बैठकीत होता. परंतु निर्णयासाठी तो अर्थ खात्याकडे सोपवण्यात आला आहे. मागणी आणि पुरवठा्याच्या स्थितीचा आढावा घेऊन मंत्रालय याबाबत काय तो निर्णय घेईल. मंत्रिगटाच्या बैठकीत महाराष्टÑासह कर्नाटक, राजस्थान, गुजरात या राज्यातील दुष्काळी स्थितीचा बैठकीत आढावा घेण्यात आला.