आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी क्षेत्रात महिलांना २६ आठवडे मातृत्व रजा, पुरुषांसाठी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- खासगी क्षेत्रासह सर्वच आस्थापनांना त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना लवकरच २६ आठवड्यांची मातृत्व रजा द्यावी लागेल. अशी तरतूद असलेले विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडून ते मंजूर करून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी शुक्रवारी सांगितले.

सरकारी महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवडे किंवा सहा महिने मातृत्व रजेची आधीच तरतूद आहे. मात्र, बहुतांश खासगी क्षेत्रे महिला कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त तीन महिनेच मातृत्व रजा देतात. त्यातच हा लाभ सर्वच, विशेषत: छोट्या आस्थापनांतील महिला कर्मचाऱ्यांना दिला जात नाही. नव्या मातृत्व लाभ विधेयकात १२ आठवड्यांऐवजी २६ आठवडे मातृत्व रजेची तरतूद असून केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ते लवकरच मांडण्यात येणार आहे. त्यानंतर श्रम मंत्रालय संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी जोर लावणार आहे, असे बंडारू यांनी सांगितले. काही आस्थापनांत मातांना घरी बसून काम करण्याची परवानगी दिली जाते, मात्र या विधेयकामुळे इतर आस्थापनांमध्ये महिलांना २६ आठवडे मातृत्व रजेचा लाभ मिळेल, असे ते म्हणाले. वडिलांना पितृत्व रजा अन्य लाभ मिळणार काय, असे विचारले असता बंडारू म्हणाले, हे विधेयक माता मुलांसाठी आहे. पुरुषांसाठी नाही.
बातम्या आणखी आहेत...