आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ अपघातातही खर्च होतात २६ हजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात होणाऱ्या रस्ते अपघातात प्रतिरुग्णामागे सरासरी २६,७३५ रुपयांहून अधिक खर्च करावे लागतात. हेच नव्हे, कोणत्याही अर्ध उत्पन्न गटातील कोणत्याही सदस्या वर हे संकट आले तर मिळकतीतील ७० टक्क्यांपर्यंतचे उत्पन्न उपचारावरच खर्च होते. अशातच पीजीआय, चंदिगडच्या डॉक्टरांनी आपल्या नव्या शोधाच्या आधारे हा दावा केला आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंट रिसर्च अँड पब्लिक हेल्थ मॅगझिनच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झालेल्या या शोधात सांगितले गेले आहे की, रस्ते अपघातात सरासरी एका पीडित (रुग्णास) आठवडाभर रुग्णालयात भरती राहतो. तथापि, सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार आणि नंतर संपूर्णपणे बरे होण्यासाठी वर्षभरापर्यंतचा काळही लागतो.

खरेतर सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालयात बहुतांश खर्च सरकारच उचलते. याच्याशिवाय सामान्य रुग्णाला सरासरी २६,७३५ रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागतो. रुग्णालयातून सुटी-डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरातील उपचारादरम्यान या उपचार रकमेपेक्षा अडीच पट अधिक पैसे औषधांसाठीही खर्च करावे लागतात.
बातम्या आणखी आहेत...