आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IS मध्‍ये सामील होण्‍यासाठी सुदानला गेलेल्‍या भारतीय Computer Expert ला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शुक्रवारी चेन्नईमधून एका 23 वर्षीय युवकाला अटक केली आहे. ISIS, इसिस या दहशतवादी संघटनेच्‍या भर्तीसाठी सुदानला गेला होता असा आरोप त्‍याच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे. सुदानमधील ट्रेनिंगनंतर त्‍याला लिबियामध्‍ये तैनात करण्‍यात येणार होते.
काय आहे प्रकरण ?
- अटक करण्‍यात आलेला युवक नसीर पकीर मोहम्मद हा computer Expert आहे.
- मे महिन्‍यात नसीर दुबईमध्‍ये होता. तेव्‍हा तो मॅड अल्‍लाह नावाच्‍या युवकाच्‍या संपर्कात आला होता.
- मॅड अल्लाहने नसीरला सुदानला जाण्‍यासाठी सांगितले होते. तेथे प्रशिक्षणानंतर त्‍याला लिबियामध्‍ये जाऊन इसिसमध्‍ये सामील व्‍हायचे होते.
- नसीरच्‍या संशयीत हालचाली लक्षात येताच सुदानच्‍या अधिका-यांनी त्‍याला अटक करून चेन्‍नईमध्‍ये पाठवले.
- NIA अध्‍यक्ष शरद कुमार यांनी नसीच्‍या अटकेला पुष्टी दिली आहे.
लिबियामध्‍ये पाठवल्‍याचे पहिले प्रकरण
- हे पहिले प्रकरण आहे की, यामध्‍ये एका भारतीयाला इसिससाठी लिबीयामध्‍ये पाठवण्‍याचा प्रयत्‍न केला जात होता.
- गृह मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनुसार आतापर्यंत 23 भारतीय इसिसमध्‍ये सामील झाले आहेत.
- 23 पैकी 6 लोकांना मारण्‍यात आल्‍याचीही माहिती आहे.
- सुरक्षा संस्थांनी आतापर्यंत 60 पेक्षा अधिक भारतीयांना इसिसमध्‍ये सामील होण्‍यापासून वाचवले आहे.
बातम्या आणखी आहेत...