आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 26 11 Mumbai Attack Carried Out By A Terror Group Based In Pakistan : Mahmud Ali Durrani, Ex Pak NSA

पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच केला होता 26/11चा हल्ला; Pakचे माजी NSA दुर्राणी यांची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईवरील  २६/११ चा अतिरेकी हल्ला पाकिस्तानातील अतिरेकी गटाने घडवून आणल्याची कबुली पाकचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्राणी यांनी सोमवारी दिली. हा हल्ला म्हणजे सीमापार दहशतवादाचे उदाहरण असल्याचे  सांगितले. 

या हल्ल्यातील सहभागाचा इन्कार करणाऱ्या पाकिस्तानचे दात याामुळे त्यांच्याच घशात गेले आहेत.१९ व्या आशियाई सुरक्षा परिषदेत दुर्राणी बोलत होते. या हल्ल्यात पाक सरकारचा हात नसल्याचे ते म्हणाले. मुंबई हल्ल्यात जिवंत पकडलेला अजमल कसाब पाकचा असल्याचे जाहीर केल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी दुर्राणी यांना एनएसएपदावरून  १० जानेवारी २००९ रोजी बडतर्फ केले होते.

संरक्षणमंत्री म्हणाले, दहशतवादाचा शांतता आणि सुरक्षेला मोठा धोका...
देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर 19th आशियन सेक्युरिटी कॉन्फरन्समध्ये देशाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला दहशवादाचा मोठा धोका असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. दहशतवादाविरोधात जगातील सर्व देशांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. अफगाणिस्तान आणि भारत मागील अनेक दशकांपासून 'प्रॉक्सी वॉर'चा सामना करत असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
 
दरम्यान, मुंबईच्या 26/11 हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात नसल्याचे पाकने म्हटले होते. लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या विरोधात पाक सरकारला अनेक पुरावे दिले आहेत. मा‍त्र, पुरावे खोटे असल्याच्या उलट्या बोंबा मारत पाकने हाफिजला मोकाट सोडले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, केव्हा आणि कसा झाला होता मुंबईवर दहशतवादी हल्ला...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...