आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात 27.19 कोटी विक्रमी धान्य उत्पन्नाचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सलग दोन वर्षे दुष्काळानंतर यंदा मान्सून चांगला बरसल्याने जूनमध्ये संपत असलेल्या २०१६-१७ पीक वर्षात देशात विक्रमी धान्य उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा आकडा २७.१९८ कोटी टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. यामध्ये गहू उत्पादन ९.६६४ कोटी टन आणि विक्रमी २.२१४ कोटी टन डाळींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाच्या वतीने बुधवारी यासंबंधीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. गहू, तांदूळ, डाळी आणि तेलबियांचे उत्पादनही आतापर्यंतच्या विक्रमी पातळीपेक्षा जास्त होण्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला.  
 
पीक वर्ष २०१३-१४ मध्ये खाद्यान्न उत्पादन विक्रमी २६.५०४ कोटी टन राहिले होते. मात्र, त्यानंतर पडलेल्या दुष्काळामुळे २०१५-१६ मध्ये खाद्यान्न उत्पादन २५.१५७ कोटी टनावर आले होते. यंदा २०१६ मध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे तसेच सरकारच्या वतीने घेण्यात अालेल्या विविध धोरणात्मक निर्णयांमुळे यंदा विक्री धान्य उत्पादन होण्याची अपेक्षा कृषी मंत्रालयाने व्यक्त केली आहे.  

यादरम्यान तांदळाचे उत्पादन ४.२६ टक्क्यांनी वाढून १०.८८६ कोटी टन राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी तांदळाचे उत्पादन १०.४४१ कोटी टन झाले होते. या आधी २०१३-१४ मध्ये १०.६६५ कोटी टन विक्री उत्पादन झाले होते. याचप्रमाणे यंदा गव्हाचे उत्पादन ४.७१ टक्क्यांनी वाढून ९.६६४ कोटी टन राहण्याचा अंदाज अाहे. २०१५-१६ मध्ये ९.३५० कोटी टन गव्हाचे उत्पादन झाले होते.
बातम्या आणखी आहेत...