आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगला असतानाही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले 27 खासदार, 5.69 कोटींचे बिल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो)
नवी दिल्ली- हॉटेलचे कोट्यवधींचे बिल नामंजूर करून लोकसभा सचिवालयने 27 खासदारांना जबरदस्त झटका दिला आहे. खासदारांना राहण्यास फ्लॅटऐवजी बंगला मिळाला असतानाही हे सर्व खासदार दिल्लीतील फाइव्ह स्टार हॉटेल अशोकामध्ये थांबले होते. हॉटेलचे बिल 5.69 कोटी रुपये आले आहे. परिणामी खासदारांचे हॉटेलचे बिल मंजूर करण्यास सचिवालयाने स्पष्ट नकार दिला आहे.

एलजेपीच्या खासदारांचे हॉटेल बिल सर्वाधिक
फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रदीर्घ काळ राहाणारे खासदारांमध्ये भाजपचा सर्वात मोठा सहयोगी पक्ष लोक जनशक्ति पार्टीचे (एलजेपी) खासदार रामकिशोर सिंह हे आघाडीवर आहे. एकट्या रामकिशोर सिंह यांचे हॉटेल बिल 10.34 लाख रुपये आहे. यानंतर कृषी राज्यमंत्री मोहनजी कल्याणजी भाई कुंदारिया यांचा क्रमांक लागतो. कुंदारिया यांचे हॉटेल बिल 5.76 लाख रुपये आहे. भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचे हॉटेल बिल 4.57 लाख रुपये असून परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांचे बिल 3.74 लाख रुपये आहे.

पर्यटन मंत्री म्हणाले, 'मी मंत्री झाल्यानंतर एक दिवसही हॉटेलमध्ये थांबला नाही'
पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांना या संदर्भात स्पष्टीकरण मागितले असता, ते म्हणाले, मंत्री झाल्यानंतर ते एक दिवसही हॉटेलमध्ये थांबले नाहीत. संसदेच्या अधिवेशनासाठी देशातील येणार्‍या खासदारांसाठी स्टेट हाऊसमध्ये एक खोली अलॉट करण्यात येते अथवा हॉटेलमध्ये खोली बुक केली जाते. खासदारांनी जास्त दिवस हॉटेलमध्ये थांबले असतील तर त्यामागे वेगळे कारण असू शकते, असे महेश शर्मा यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन काळातही हॉटेलमध्ये थांबले होते खासदार
दरम्यान, संसदेच्या अर्धसंकल्पीय अधिवेशनाच्या काळातही बहुतांश खासदार दिल्लीत हॉटेलमध्ये थांबले होते. खासदारांचे हॉटेलमध्ये राहाण्याचे बिल सुमारे 25 कोटी रुपये आले होते. अनेक खासदारांना सरकारी घर मिळाले नाही, तसेच जे घर मिळाले आहे ते राहाण्यास योग्य नसल्याचे खासदारांनी म्हटले होते.