आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 29 IAF Officers Sought Retirement In Last 2 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

29 हवाई दल अधिकार्‍यांना हवी स्वेच्छानिवृत्ती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पदोन्नतीच्या संधीची शक्यता दृष्टिक्षेपात नसल्याने भारतीय हवाई दलातील 29 अधिकार्‍यांनी गेल्या दोन वर्षांत स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. 29 पैकी 20 अधिकार्‍यांचा अर्ज मंजूर करण्यात आला असल्याचे माहिती संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी लेखी उत्तरात दिली.

2012 मध्ये 21 तर 2013 मध्ये 13 अधिकार्‍यांनी अर्ज केले होते. यातील सात जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. हवाई दलात अधिकार्‍यांची कमतरता असून वैमानिकांच्या मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त आहेत. भूदल, नौदल व हवाई दलामध्ये पुरुषांप्रमाणे महिला अधिकार्‍यांना पदोन्नतीच्या संधी आहेत, असे अ‍ॅँटनी यांनी स्पष्ट केले.

भारत आणि अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी 4 ऑक्टोबर 2011 रोजी करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. अफगाण सुरक्षा फौजांसाठी प्रशिक्षण व क्षमता विकास कार्यक्रम राबविला जात आहे. नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटेटिव्हनेस कौन्सिल अध्यक्षांचा उच्चस्तरीय गट नागरी विमान उत्पादनाबाबत निर्णय घेईल, असे अ‍ॅँटनी म्हणाले.