आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 2G Case: Anil Ambani Deposes Before CBI Court, Denies Knowledge About Swan Telecom

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोर्टात अनिल अंबानींना टूजी प्रकरणाचा विसर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टूजी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात उद्योगपती अनिल अंबानी यांनी सीबीआयला दिलेली साक्ष गुरुवारी फिरवली. अंबानी न्यायालयात म्हणाले, ‘स्वान टेलिकॉमविषयी मला काहीच आठवत नाही. सीबीआयने काय साक्ष नोंदवली, तेही मला माहीत नाही, सरतेशेवटी कोर्टाने त्यांना ‘उलटलेला साक्षीदार’ घोषित केले. आता शुक्रवारी या प्रकरणात टीना अंबानी यांची साक्ष नोंदवली जाईल.

अंबानी म्हणाले, ‘मी फेब्रुवारी 2011 मध्ये सीबीआयला दस्तऐवज सोपवला नाही. यावर अंबानींना उलटलेला साक्षीदार ठरवण्याची सीबीआय वकील यू.यू.ललित यांची विनंती न्यायाधीश ओ.पी. सैनी यांनी मान्य केली. शेवटी सीबीआयला साक्षीदाराची उलटतपासणी घ्यावी लागली. चार तासांच्या जबाबात अंबानींचे एकच उत्तर होते - ‘मला काही आठवत नाही’. स्पेक्ट्रमसाठी त्यांच्या समूहाने फ्रंट कंपनीच्या रूपात स्वान टेलिकॉमचा वापर केल्याचे कबूल करण्यास अंबानींनी नकार दिला. गुरुवारी त्यांची साक्ष पूर्ण झाली. त्यांनी सहकार्य न केल्यानंतरही सीबीआयने टीना अंबानी यांची साक्ष नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे.

साहेब, काही तरी आठवण्याचा प्रयत्न करा : कोर्ट
अंबानी यांनी सांगितले की, स्वान टेलिकॉम ही आपल्या समूहाची कंपनी आहे की नाही, हेच आपल्याला आठवत नाही. यावर न्यायाधीश ओ.पी. सैनी म्हणाले, ‘साहेब तुम्ही जरा जास्तच विसरत आहात, काही ना काही तरी आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्याच कंपन्यांची नावे ठाऊक नाही, हा जबाब तुमच्याच विरोधात जाऊ शकतो. यानंतर कोर्टाने तुमच्यावर कुणाचा दबाव तर नाही, अशीही विचारणा केली. यावर अंबानी उत्तरले, माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, मला कुणीही धमकी दिलेली नाही, मी स्वेच्छेने साक्ष नोंदवत आहे.

अंबानींना हे आठवले नाही
1. स्वान टेलिकॉममधील गुंतवणूक. स्वानचे प्रवर्तक शाहिद उस्मान बलवा व विनोद गोयंका प्रकरणात आरोपी आहेत.
2. आरटीएलने स्वान टेलिकॉममध्ये 9.9 % गुंतवणूक केली की नाही.
3. सीबीआय कार्यालयात गेले होते. मात्र साक्ष नोंदवली की नाही.
4. एएए कन्सल्टन्सी सर्व्हिस, एडीई व्हेन्चर्स लि., पॅरेट कन्सल्टन्ट, टायगर ट्रेडर्स, झेब्रा कन्सल्टन्ट, स्वान टेलिकॉम, स्वान कन्सल्टंट्सची या आपल्या समूहाच्या कंपन्या आहेत की नाही.
5. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकांत बैठकांत भाग घेतला आहे, यामुळे शेअर्स हस्तांतरण केले होते की नाही, काहीच आठवत नाही.