आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2G Scam: Court To Hear Final Arguments From Nov 10

टूजी स्पेक्ट्रम घोटाळा : राजा, निमोझीविरुद्ध अंतिम सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टूजी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात आता ए. राजा आणि कनिमोझी यांच्याविरोधात अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू होईल. सुनावणी १० नोव्हेंबर रोजी होईल. बचाव पक्षाने दिलेल्या पुराव्याची दिल्ली न्यायालयात नोंद करण्यात आली आहे.

खटला तीन वर्षांपासून सुरू असून दोन्ही पक्ष अंतिम युक्तिवाद करतील. या प्रकरणी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोझी आणि अन्य १५ आरोपी आहेत. टूजी स्पेक्ट्रमच्या १२२ परवाने वाटपामुळे ३० हजार कोटी रुपये महसूल बुडाल्याचा सीबीआयचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१२ मध्ये हे परवाने रद्द केले.

या प्रकरणी सीबीआयने १५३ साक्षीदारांचा जबाब नोंदवला. आपल्या बचावासाठी आरोपींनी २९ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी टूजी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची सुनावणी १८ सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकली. या काळात आरोप निश्चित केले जातील. या प्रकरणातही राजा, कनिमोझी आिण अन्य १७ आरोपी आहेत.