आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2G Scam News In Marathi, Kanimozhi News ,divya Marathi

टूजी घोटाळा : कनिमोझी, राजा आज हजर होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टूजी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी दूरसंचारमंत्री ए.राजा सोमवारी न्यालयात हजर राहू शकतात. द्रमुक खासदार कनिमोझी व पक्षप्रमुख एम. करुणानिधी यांच्या पत्नी दयालू अम्माल आणि 16 अन्य आरोपी हजर राहण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) खटला दाखल केला आहे. न्यायालयाने 2 मे रोजी आरोपपत्राची स्वत:हून दखल घेतली होती. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी. सैनी यांच्यासमोर आरोपींना हजर व्हावे लागेल. न्यायालयाने सर्व आरोपींना समन्स पाठवून 26 मे रोजी हजर राहण्यास सांगितले होते.
आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. या प्रकरणाला टूजी घोटाळ्यापासून सुरुवात झाली आणि त्यानंतर संबंधित आरोपींनी मनी लाँड्रिंगविरोधी कायद्याअंतर्गत कट रचून त्यास अंतिम स्वरूप देण्यात आल्याचे ईडीने याआधी न्यायालयाला सांगितले आहे. ईडीने 25 एप्रिल रोजी 19 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये नऊ कंपन्यांचा समावेश आहे.