आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2g Spectrum Scam Case Court Grantsbail A Raja Kanimozhi Shahid Balwa

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी ए राजा, कनिमोळी आणि दयालु अम्मल यांना जामीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आणि माजी दूरसंचार मंत्री ए. राजा, द्रमुकचे प्रमुख एक करुूणानिधी यांची कन्या कनिमोळी यांच्यासह सात जणांना आज (बुधवार) जामीन मंजूर केला. दिल्लीतील सीबीआयच्या विशेष कोर्टात ही सुनावणी झाली.
न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी सर्व आरोपींचे जामीन अर्ज स्विकारले. नंतर प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. याशिवाय जातमुचलक्या इतकीच रोख रक्कमही कोर्टात जमा करण्याचेही आदेश न्यायाधीश सैनी यांनी दिले आहेत.

दरम्यान, यापूर्वी कोर्टाने द्रमुक प्रमुख एम. करुणानिधी यांची पत्नी दयालु अम्मल यांचा जामीन अर्ज कोर्टाने मंजूर केला होता. 83 वर्षीय अम्मल यांना पाच लाख रुपयांची वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. परंतु वाढते वय आणि शारीरिक तसेच मानसिक अस्वास्थ्यामुळे आपली सर्व आरोपातून मुक्तता करावी, अशी विनंती अम्मल यांनी कोर्टाला केली होती. परंतु कोर्टाने अम्मल यांची मागणी फेटाळून लावली. तसेच अम्मल यांना दोन दिवसांच्या आत जातमुचलका सादर करण्‍याचे निर्देशही कोर्टाने यावेळी दिले.

ए राजा, कनिमोझी, शाहिद बलवा, विनोद गोयनका, आसिफ बलवा, राजीव अग्रवाल, करीम मोरानी आणि शरद कुमार हे सगळे टू जी स्पेक्ट्रम वितरण गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी आहेत.