आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या तपासासाठी स्थापण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) पंतप्रधान मनमोहनसिंग व अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना क्लीन चिट दिली आहे. शुक्रवारी झालेल्या
जेपीसीच्या बैठकीत ब-याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मसूदा अहवाल बहुमताने मंजुर केला. या माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना दोषी ठरवण्यात आले आहे. राजा यांनी टूजी स्पेक्ट्रमबाबत पंतप्रधानांना चुकीची माहिती दिल्याचे समितीने मान्य केले. 27 सदस्यांच्या उपस्थितीत बैठकीत अहवालाच्या समर्थनार्थ 16 तर विरोधात 11 मते पडली. जदयूच्या दोन तर भाजपच्या एका सदस्याने मतदान केले नाही.
30 सदस्यांच्या जेपीसीत सपा, बसपाने सरकारला पाठिंबा दिला. समितीच्या अहवालाचा मसूदा एप्रिलमध्ये जारी झाला होता. मात्र तेव्हापासून आतापर्यंत त्यावर बैठक झाली नव्हती. तेव्हा समितीतील सदस्यांत मतभेद होते. सरकारने सदस्यांना मॅनेज करण्याठीच बैठक बोलावल्याचा विरोधी पक्षांचा आरोप होता. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनापर्यंत समितीला मुदतवाढ देण्यात आली होती.
मतांचे गणित :
अहवालाच्या बाजूने : 16 (काँग्रेस-11 राष्ट्रवादी काँग्रेस-1, बसपा-2, सपा-1, नामांकित सदस्य अशोक गांगुली)
अहवालाच्या विरोधात : 11 (भाजप-5, बीजेडी, तृणमूल, भाकप, माकप, एआयडीएमके व डीएमके प्रत्येकी एक)
अनुपस्थित : 3 (जदयू-2, भाजप-1)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.