आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2nd Day Of BJP National Executive Meet: PM Modi Speaks About Transparency In Political Funding

भाजपच्‍या बैठकीत नरेंद्र मोदी म्‍हणाले, निवडणूक निधीमध्‍ये पारदर्शकता हवी, गरीबांचा वापर नको

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी भाजपच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्‍या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदी. - Divya Marathi
शनिवारी भाजपच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्‍या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदी.
नवी दिल्‍ली - शनिवारी भाजपची राष्‍ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यामध्‍ये नरेंद्र मोदींनी पक्षांना दिल्‍या जाणाऱ्या निधीचा मुद्दा उपस्थित केला. मोदी म्‍हणाले, \'निधीमध्‍ये पारदर्शकता हवी. फक्‍त निवडणूक जिंकण्‍यासाठी गरीबांचा वापर केला जाऊ नये. आपल्‍यासाठी ते व्‍होट बँक नाहीत. गरीबी सेवा करण्‍याची संधी आहे. ही ईश्‍वराची सेवा आहे.\'  
 
यावेळी मोदींनी नोटबंदीवरही भाष्‍य केले. ते म्‍हणाले, \'सामान्‍य जनतेने नोटबंदीच्‍या निर्णयाचा स्‍वीकार केला आहे. निर्णय देशाच्‍या विकासासाठी महत्‍वाचा होता.\'  
  
आगामी पाच राज्‍यातील निवडणुकासंबंधी चर्चा करण्‍यासाठी या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. 

काय म्‍हणाले नरेंद्र मोदी?
- बैठकीनंतर रविशंकर प्रसाद यांनी मोदींच्‍या भाषणाबद्दल प्रसारमाध्‍यामांना माहिती दिली. 
- प्रसाद यांनी सांगितल्‍याप्रमाणे मोदी म्‍हणाले, पक्षांना दिल्‍या जाणाऱ्या निधीमध्‍ये पारदर्शकता असावी आणि भाजप यासाठी महत्‍वाची भूमिका निभावू शकतो. 
- भाजप याबद्दल सर्व पक्षांची चर्चा करण्‍यास तयार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.   
- राष्‍ट्रपतींनीही यासंबंधी भाष्‍य केले आहे, याची आठवण यावेळी मोदींनी करुन दिली. 

मोदींनी का उपस्थित केला हा मुद्दा?
- राजकीय पक्षांची नोंदणी \'लोकप्रतिनिधित्‍व कायदा 1951\' अंतर्गत केली जाते. 
- देशात किमान 1000 पक्ष असे आहेत, ज्‍यांनी 2014 लोकसभा निवडणूकीत भाग घेतला नव्‍हता.
- पक्षांना वितरीत होणाऱ्या निधीमध्‍ये काळ्या पैशाचे प्रमाण सर्वाधिक असते. 
- पक्षांना जास्‍तीत जास्‍त निधी टप्‍या-टप्‍यात वितरीत केला जातो. 
- 20 हजार रुपयांपेक्षा कमी निधी असल्‍यास त्‍याचा हिशोब पक्षाला द्यावा लागत नाही. 
- 20 हजार रुपयांपेक्षा पेक्षा कमी निधी कार्यकर्त्‍यांच्‍या खात्‍यात जमा केला जातो आणि पाहिजे तेव्‍हा खर्च केला जातो.
- या निधीवर कर लागत नाही. 
 
भाजपला किती मिळतो निधी?
- 2015-16 मध्‍ये देशातील सात प्रमूख पक्षांना 20 हजार रुपयांपेक्षा जास्‍त मिळणाऱ्या निधीमध्‍ये मोठी घसरण झाली होती. 
- या पक्षांना फक्‍त 102.2 कोटी निधी मिळाला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्मच्‍या अहवालानूसार 2014-15मधील रकमेपेक्षा ही रक्‍कम 84 टक्‍क्‍यांनी कमी आहे. 
- 2014-15मध्‍ये 528 कोटींचा निधी पक्षांना मिळाला होता. 
- भापजला सर्वाधिक 76 कोटी निधी मिळाला होता. सर्व पक्षांना मिळणाऱ्या निधींपैकी हे प्रमाण 75टक्‍के आहे. 
- मात्र हे प्रमाण मागील वर्षापेक्षा 82 टक्‍के कमी आहे. 
- 1.17 कोटी रुपयामध्‍ये सर्वाधिक कॅश काँग्रेस पक्षाला मिळाली आहे. संपूर्ण निधीतील याचे प्रमाण 6 टक्‍के आहे. 
- कॉर्पोरेट निधी मिळवण्‍यामध्‍ये भाजप  सर्वात पूढे आहे. भाजपला सर्वाधिक 67.99 कोटी रुपये निधी मिळाला आहे. काँग्रेसला फक्‍त 8.83 कोटी मिळाले आहेत. 
- मायावती यांच्‍या बहूजन समाज पक्षाला मागील 10 वर्षात रुपये 20,000 पेक्षा जास्‍त एकही निधी मिळालेला नाही. 
 
नोटबंदीवर काय म्‍हणाले मोदी?   
- मोदी म्‍हणाले, \'मी म्‍हणालो होतो जनतेला काही काळ त्रास सहन करावा लागेल. मात्र देशाच्‍या विकासासाठी हा निर्णय घेणे आवश्‍यक होते. जनतेने हे समजून घेतले आणि या निर्णयामध्‍ये सरकारला साथ दिली. जनतेची ताकद काय असते हे मला कळाले आहे. पुर्ण दोन महिने लोकांनी त्‍यांच्‍या शक्तिचे दर्शन दिले आहे.\' 
- मोदींनी आपल्‍या भाषणात \'बेटी बचाओ- बेटी पढाओ\' योजनेवरही भाष्‍य केले. ते म्‍हणाले, देशातील प्रत्‍येक मूलीने शिकावे ही आमची इच्‍छा आहे. गरीबांच्‍या मुली आजही शिक्षण घेऊ शकत नाहीत. हे वास्‍तव आहे. 
- प्रसाद यांनी सांगितले की, छत्‍तीसगड येथे 90 वर्षीय वृध्‍द आदिवासी महिलेने शौचालय बनवण्‍यासाठी आपली बकरी विकली होती. ही घटना मोदींना समजल्‍यानंतर ते तिथे गेले आणि महिलेचे आशिर्वाद घेतले. 
 
पुढील स्‍लाईडवर वाचा, गरीबीबद्दल काय म्‍हणाले मोदी?
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...