आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन किलोचे गॅस सिलिंडर येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी सध्याच्या 19 किलो, 14 व 5 किलो सिलिंडरसारखे 3 किलोचे सिलिंडर बाजारात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इंडियन ऑइलचे संचालक (मार्केटिंग) मकरंद नेने यांनी ही माहिती दिली. लोकांच्या मागणीनुसार यापूर्वी 5 किलोचे सिलिंडर बाजारात आले होते. आता त्यापेक्षा कमी वजनाचे सिलिंडर वितरित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या इंडोनेशियात 3 किलोचे सिलिंडर मिळते.सध्या 5 किलोचे सिलिंडर देशातील प्रमुखा 11 शहरांत उपलब्ध असून यापेक्षा छोटे सिलिंडर ग्रामीण भागातील ग्राहकांच्या सोयीसाठी बाजारात आणले जाणार आहे.ते रिटेल आऊटलेट, किराणा दुकानांवरही उपलब्ध होऊ शकणार आहे.