आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू काश्मिरमध्ये एन्काऊंटर; सोपोरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सोपोर जिल्ह्यातील अमरगड येथे आज (सकाळी) जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

या घटनेत एक भारतीय जवान जखमी झाला आहे. दहशतवाद्यांकडून तीन एके-47 जप्त करण्यात आल्या आहेत. चकमकीनंतर जवानांनी सर्च शोधमोहीम सुरू आहे.

 न्यूज एजन्सी एएनआयनुसार, कमांडिंग ऑफिसर राजेश्वर जमवाल याने सांगितले की, आम्ही दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी आमच्या दिशेने गोळीबार केला. त्यांना जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यात तिन्ही दहशतवादी मारले गेले.
 


टॉप कमांडर अबु दुजानचा खात्मा...
काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी एका आठवड्यात चार एन्काऊंटर केले आहेत. लश्कर-ए- तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजाना याच्यासह 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. पोलिसांनी सांगितले की, दुजाना काश्मीरमध्ये अय्याशी करत होता. तरुणी तसेच महिलांना त्याच्यापासून धोका होता.

काश्मीरमध्ये एका आठवड्यात  4 एन्काऊंटर
- गुरुवार-शुक्रवारच्या रात्री सुरक्षा रक्षकांनी अनंतनागमध्ये एन्काऊंटर केले. यात यावर नामक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. यावर याने एक महिन्यापूर्वीच हिजबुल मुझाहिदीन जॉईन केले होते.
- यावर याच्याकडून पोलिसांनी एक सेल्फ लोडिंग रायफल (SLR), 2 मॅगझीन, आणि 40 राउंड काडतूस जप्त केले होते. यावर याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे.
- गुरुवारी कुलगाममध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी 2 दहशतवादांना खात्मा केला होता.
- 1 ऑगस्टला सुरक्षा दलाने पुलवामामधील हाकरीपोरामध्ये केलेल्या एन्काऊंटरमध्ये लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानासह 2 दहशतवाद्यांना मारले.
- 30 जुलैला पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. तहाब भागात दोन दहशतवादी मारले गेले होते.
बातम्या आणखी आहेत...