आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला 3 राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबई येथील मास्टर जैसेल शाह, आरंभ इंडिया या संस्थेला आणि पुणे जिल्ह्यातील शांतीलाल गुलाबचंद मुथा यांना बालकांकरिता केलेल्या उत्तम सेवेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्लीत राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
 
राष्ट्रीय बाल पुरस्कारात विशेष उल्लेखनीय प्रावीण्य गटात मुंबई येथील मास्टर जैसेल शाह यास बुद्धिबळ खेळातील नैपुण्याकरिता दहा हजार रुपये रोख, रजत पदक, प्रमाणपत्र, याशिवाय दहा हजार रुपयांचे पुस्तक व्हाऊचर देण्यात आले  आरंभ इंडिया  या  मुंबईतील बाल लैंगिक शोषण विरोधी कार्य करणाऱ्या संस्थेस गौरविण्यात आले.  ३ लाख  रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही संस्था लौंगिक शोषण झालेल्या बालकांचे पुनर्वसनाचे काम पाहते, यासह लौंगिक शोषणाबाबत प्रचार-प्रसाराचे काम करते. ही संस्था युनिसेफशी जोडलेली आहे.  

दिव्यांग बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना राजीव गांधी मानव सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील शांतीलाल गुलाबचंद मुथा यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार व्यक्तिगत सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख, रजतपदक, प्रमाणपत्र असे आहे.
बातम्या आणखी आहेत...