आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Grey Swift Dzire Has 3 Pak Terrorists And Explosives, Warns Punjab Police

भारतात ३ पाकिस्तानी दहशतवादी घुसले; दिल्ली, गोवा, मुंबईत अलर्ट जारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - दिल्ली पोलिसांनी तीन सशस्त्र पाकिस्तानी अतिरेकी घुसल्याची शक्यता वर्तवल्यानंतर पंजाबमध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. तिघे अतिरेकी आत्मघातकी हल्लेखोर असल्याची शक्यता आहे.
तीन अतिरेकी स्थानिक नागरिकांसोबत जम्मू-काश्मीरमध्ये राखाडी रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने प्रवास करत होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी बनिहाल बोगदा पार केला असावा, असे या इशाऱ्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. अतिरेक्यांचे लक्ष्य दिल्ली, गोवा किंवा मुंबई असू शकते. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर राज्यांत इशारा जारी केल्याचे पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पंजाबच्या पोलिस महासंचालकांनी राज्यांतील सर्व आयुक्त पाेलिस अधीक्षकांना सावधनतेचा इशारा जारी केला आहे. जेके ०१ एबी २६५४ क्रमांकाच्या कारमधून तीन पाकिस्तानी अतिरेकी स्थानिक नागरिकांसोबत प्रवास असून त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा व आत्मघातकी बेल्ट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांना वाहनांची तपासणी, पोलिस आणि संरक्षण खात्यांच्या इमारतीसह मुख्य संस्थांची सुरक्षा, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, मॉल्स, रेल्वेस्थानके, शैक्षणिक संस्था आणि रेल्वे रुळांच्या सुरक्षेवर भर देण्यास सांगण्यात आले आहे.
जानेवारी महिन्यात अतिरेक्यांनी पठाणकोट हवाई तळावर केलेल्या हल्ल्यात सात जवानांचा मृत्यू झाला होता.
कोणत्‍या राज्‍यांना केले अलर्ट...
> गुप्तचर संस्थने दिल्ली, मुंबई आणि गोवा पोलिसांना कडक सुरक्षा व्‍यवस्‍था ठेवण्‍याचे सांगितले.
> गुप्‍तचर संस्‍थेच्‍या माहितीनुसार, दहशतवादी तीन राज्‍यांना निशाना बनवू शकतात.
> दिल्लीमध्‍ये अटकेत असलेल्‍या काही दहशतवाद्यांची चौकशी केल्‍यानंतर सुरक्षा संस्‍थांनी अलर्ट जारी केला.

कशी आहे कार?
> ग्रे कलरची स्विफ्ट डिजायर कारने दहशतवादी पळाले असून, तिचा क्रमांक JK-01 AB-2654 असल्‍याचे सांगितले जात आहे.
> या कारमध्‍ये स्‍फोटके असल्‍याचेही सांगितले जात आहे.
> पंजाब पोलिसांनीसुद्धा पंजाबमध्‍ये अलर्ट जारी केला.