आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांची जुळ्या भावंडांचा वॉशिंग मशिनमध्ये पडून मृत्यू, आई गेली होती डिटर्जंट आणण्यास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग मशिनमध्ये पडून तीन वर्षांच्या दोन जुळ्या भावंडांचा मृत्यू झाला. - Divya Marathi
वॉशिंग मशिनमध्ये पडून तीन वर्षांच्या दोन जुळ्या भावंडांचा मृत्यू झाला.
नवी दिल्ली - येथील रोहिणी भागातील दोन जुळ्या मुलांचा (3 वर्षे) वॉशिंग मशिनमध्ये पडून मृत्यू झाला. मुलांची आई त्यांना घरात सोडून डिटर्जंट पावडर आणण्यासाठी दुकानात गेली होती. 6 मिनिटांनी महिला परत आली तर मुले कुठेही दिसली नाही. म्हणून तिने पोलिसांना कॉल केला. बराचवेळ शोधाशोध केल्यानंतर दोन्ही मुले वॉशिंग मशिनच्या वॉटर टँकमध्ये सापडली. 
 
मुलांसोबत अशी झाली दुर्घटना
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुर्घटना रोहिणी भागातील विजय विहार येथे घडली. कोटक महिंद्रामध्ये नोकरी करत असलेले रविंद्र आणि त्यांची पत्नी राखी तीन मुलांसह येथे राहातात.
- मोठा मुलगा 10 वर्षांचा आहे तर निशांत आणि नक्षय हे तीन-तीन वर्षांची जुळी मुले होती. 
- अशा प्रकारच्या अनेक घटना मागील काही वर्षांत समोर आल्या आहेत. गेल्यावर्षी 18 मे रोजी कर्नाटकमधी गुलबर्गा येथे एक मुलगा वॉशिंग मशिनमध्ये अडकला होता. 
 
कशी घडली घटना 
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साधारण 1 वाजेच्या दरम्यान राखी वॉशिंग मशिनमध्ये कपडे धूत होती.
- जुळी मुले निशांत आणि नक्षय तिच्या जवळच खेळत होते. त्याचवेळी राखी डिटर्जंट पावडर आणण्यासाठी बाहेर गेली.
- त्याचवेळी दोन्ही मुले खेळता खेळता मशिनवर चढले आणि कपडे धुण्याच्या टाकीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. 
- राखी साधारण 6 मिनिटांनी घरी परत आली तेव्हा मुले कुठेही दिसली नाही. बराचवेळ शोधाशोध करुनही मुले सापडली नाही त्यामुळे भयभीत झालेल्या राखीने पोलिसांना कॉल केला.
- शेजाऱ्यांना विचारपूस करुन पोलिसांनीही मुलांचा शोध घेतला. मात्र जेव्हा मुलांचे वडील ऑफिसमधून घरी आले तेव्हा त्यांना मशिनच्या वॉटर टँकमध्ये मुले सापडली. 
- रविंद्र आणि राखी मुलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले मात्र तोपर्यंत जुळ्या भावंडाची प्राणज्योत मालवली होती. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...