आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Visit : 30 Car\'s And Fuel For It Will Came From US

अमेरिकेहून 30 कारसह त्या गाड्यांसाठी इंधनही घेऊन येणार ओबामांचे सुरक्षारक्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रजासत्ताक दिनी होणार्‍या फ्लाय पास्टचे संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली - 26 जानेवारीला राजपथावर होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या दौर्‍यासाठी अमेरिकेहून 30 कारसह त्या गाड्यांसाठी इंधनही आणले जाणार आहे.

दरम्यान ओबामांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता त्यांची उपस्थिती असेल त्यावेळी राजपथावर 5 किलोमीटरच्या परिसरात नो फ्लाय झोन (विमान वाहतुकीस परवानगी नसणे) घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, भारताने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यासाठी 26 जानेवारीला होणारा पारंपरिक फ्लाय पास्ट रद्द करावा लागणार असल्याने, भारताने ही मागणी मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

अमेरिकेच्या सुरक्षा संस्था नो फ्लाय झोन संदर्भात डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन (डीजीसीए)च्या संपर्कात होत्या, अशी माहिती होती. भारतीय अधिकार्‍यांच्या मते राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडदरम्यान फक्त 10 मिनिटांसाठी दोन इंजिन असणारे सैन्याचे विमान आणि हेलिकॉप्टर यांचे उड्डाण होत असते. राष्ट्रपती भवन, पीएम निवास, साऊथ आणि नॉर्थ ब्लॉकच्या वरच्या भागात वर्षभर नो फ्लाय झोन असते, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. राजपथावर परेडमध्ये 18 फायटर जेट, 5 विमाने आणि 10 हेलिकॉप्टर यांचा सहभाग असतो. हे सर्व जमिनीपासून 60 ते 300 मीटर उंचीवरून उड्डाण घेतील. यादरम्यान नेव्हीचे सुपरसोनिक फायटर एमआयजी-29 हेही उड्डाण घेईल.

दरम्यान ओबामांसमोर अमेरिकेकडून भारताने 7 अब्ज डॉलर मध्ये अधिग्रहीत केलेले सी-130जे सुपर हर्क्युलस, सी-17 ग्लोबमास्टर-3 स्ट्रॅटेजिक एअरलिफ्ट, पोसेडॉन-81 ही विमानेही सादर केली जातील. पाइपलाइनमध्ये 2.5 अब्ज डॉलरचे अॅपेक अटॅक आणि चिनूक हेवी-लिफ्ट हेलिकॉप्टर खरेदी करण्याचीही योजना आहे. ओबामांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले 'द बीस्ट' कॅडिलॅक वन डिजाइन कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यापासून अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे संरक्षण करण्यात सक्षम आहे.