(फोटो- मोदी सरकारकडून सर्वांनाच खुप अपेक्षा आहेत.)
नवी दिल्ली- नरेंद्र मोदी सरकारला आज 30 दिवस पूर्ण झाले. त्यामुळे त्यांच्या 30 दिवसांच्या शासन काळाची जोरात चर्चा सुरू आहे. निवडणुकांप्रमाणे अजूनही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 27 मेपासून 25 जूनपर्यंत मोदी सरकारचे कौतुक करण्यात आले तर काही विषयांवर जोरदार प्रहार करण्यात आला.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने स्पष्ट केले होते, की आता बदल हवा आहे. बदल म्हणजेच विकास. निवडणूक प्रचारातही मोदींनी केवळ आणि केवळ विकासाचे राजकारण केले. आता त्यांच्या निर्णयांवर देशाची नजर टिकली आहे.
जेव्हा मोदींनी 26 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा मुंबईतील रहिवासी विपूल मेहरा या युवकाने हातात व्हाइट बोर्ड आणि मार्कर घेऊन एक अभियान सुरू केले. त्याने लोकांना विचारले, की नव्या सरकारकडून तुमच्या कोणत्या अपेक्षा आहेत. तो एखाद्याला प्रश्न विचारतो तेव्हा त्याचे उत्तर त्याच बोर्डवर लिहून घेतो. त्यानंतर याची छायाचित्रे त्याचा ब्लॉग http://abkibaar.wordpress.com/page/2/ वर अपलोड करतो.
पुढील स्लाईडवर फोटोंच्या माध्यमातून जाणून घ्या, तरुणी, महिला, पुरुष, मुले आदींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा...