आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 औषधांची कमाल किंमत निर्धारित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - औषधी मूल्य निर्धारक एनपीपीएने आणकी ३० औषधांच्या कमाल किमती निश्चित केल्या आहेत. त्यामध्ये क्षयरोग, मधुमेह आणि दम्याच्या औषधांबरोबरच प्रतिजैवकांचाही समावेश आहे. राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण नियामकाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कमाल किमती निर्धारित केलेल्या औषधांमध्ये रिफॅपिसीन (जीवाणू संसर्ग. उदा. टीबी), आयब्रुप्रोफेन (ताप, दुखणे), सॅलबुटामोल सल्फेट (दमा), ग्लायम्पिराइड मेटफॉर्मिन (मधुमेह) या औषधांचा समावेश आहे. अत्यावश्यक औषधांच्या यादीत सध्या ६८० औषधे आहेत. एनपीपीएने त्यापैकी ५२१ औषधांची कमाल किंमत निश्चित केली आहे.
बातम्या आणखी आहेत...