आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 30 Students Admitted To Nearby Hospital After Gas Leakage From A Container In Tughlakabad

वायू गळतीमुळे दिल्लीत तीनशे विद्यार्थी आजारी; श्वासोच्छ्वासाला त्रासाची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुघलकाबाद परिसरातील विषारी वायूच्या गळतीनंतर पीडित मुलांना रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाबाहेर पालकांची गर्दी. - Divya Marathi
तुघलकाबाद परिसरातील विषारी वायूच्या गळतीनंतर पीडित मुलांना रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाबाहेर पालकांची गर्दी.
नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीच्या तुघलकाबाद परिसरात शनिवारी सकाळी एक कंटेनर डेपोमधून वायू गळती झाल्याची घटना घडली. हा विषारी वायू काही वेळातच परिसरात पसरला. त्यामुळे या भागातील दोन सरकारी शाळांतील ३०१ विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. 

विद्यार्थ्यांसह नऊ शिक्षकही आजारी पडले. वायू गळतीचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. विद्यार्थ्यांनी डोळ्यात जळजळ, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखीची तक्रार केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषारी वायू गळतीमुळे दोन शाळा बंद कराव्या लागल्या. प्राथमिक तपासानुसार वायू गळती कंटेनरमधून झाली आहे. हा कंटेनर सोनिपतला जात होता. दिल्ली सरकारने जिल्हाधिकारी स्तरावर तपासाचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राजधानीतील बत्रा रुग्णालयात ५५ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले होते. १० ते१४ वयोगटातील मुलांचा पीडितांमध्ये समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
मजिठिया रुग्णालयात १०७ मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.काही विद्यार्थ्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. परंतु सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नायब राज्यपाल अनिल बैजल,मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी रुग्णालयात जाऊन पीडितांची विचारपूस केली. शाळा बंद ठेवण्यात आली आहे. 
 
शाळेचे दुर्लक्ष कारणीभूत
- सकाळी शाळा सुरू होताना हा परिसर विषारी वायूने व्यापला होता. त्याकडे शाळेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यांनी वेळीच त्याकडे गांभीर्याने पाहिले असते तर त्यांना वायू गळतीच्या परिणामांची कल्पना आली असती. त्यांनी त्याच वेळी विद्यार्थ्यांना परत घरी पाठवायला हवे होते.
विजेंद्र गुप्ता, विरोधी पक्ष नेता, दिल्ली विधानसभा
 
सात पथके सक्रिय
कंटेनरमधून वायू गळतीची घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. दिल्लीच्या अग्निशमन दलास याची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी धावले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सात पथके सक्रिय होती. 
 
शाळांतील परीक्षा रद्द
विषारी वायू गळतीच्या घटनेनंतर दोन्ही शाळांतील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी दिली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, घटनेशी संबंधित फोटोज...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...