आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 30 Thousand Hospitals Take Arbitrary Fees, Latest News In Marathi

महागड्या उपचारांमुळे दरवर्षी ६ कोटी गरीब, देशात ३० हजार रुग्णालये घेतात मनमानी फीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महागड्या उपचारांमुळे देशात दरवर्षी ६.३ कोटी लोक गरीब होत आहेत. यामुळे लोक आपले वाढते उत्पन्न व अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. नॅशनल हेल्थ पॉलिसीच्या मसुद्यात हा दावा करण्यात आला आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटवर याआधारे किफायतशीर उपचार उपलब्ध करून देण्याच्या नव्या धोरणाचा पुरस्कार करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या मसुद्यात देशातील सध्याच्या वैद्यकीय उपचार प्रणालीचा ऊहापोह करण्यात आला आहे.

यात म्हटले आहे की, गरिबीमध्ये सर्वात मोठे योगदान हे महागड्या वैद्यकीय उपचारांचे आहे. कारण महागड्या उपचारांसाठी कोणत्याच प्रकारचे सुरक्षा कवच उपलब्ध नाही. २०११-१२ मध्ये उपचारांवर कुटुंबाच्या खर्चाचा हिस्सा ग्रामीण भागात ६.९ तर शहरी भागात ५.५ टक्के इतका आहे. २००४-०५ मध्ये १५ टक्के कुटुंबे महागड्या उपचारांमुळे त्रस्त होती. २०११-१२ मध्ये हे प्रमाण वाढून १८ टक्के इतके झाले आहे. देशात जवळपास ३० हजार रुग्णालये उपचाराच्या वेळी रुग्णांकडून मनमानी फीस वसूल करतात. त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. इर्डाने अशा रुग्णालयांची यादी तयार केली आहे. त्यात अनेक बड्या रुग्णालयांचा समावेश आहे. परंतु त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
हा कायदा झाल्यास एक कोटीपेक्षा जास्त लोकांना थेट लाभ होईल. गंभीर आजारावरील उपचारांत त्यांना खर्च करावे लागणारे पैसे वाचतील. लाखो रुपये खर्च कराव्या लागणाऱ्यांच्या संख्येत घट होईल. त्यांचा पैसा वाचे अशी सुधारेल स्थिती हेल्थ पॉलिसी -२०१५ मध्ये राइट टू हेल्थ. याअंतर्गत एखादा डॉक्टर किंवा रुग्णालय उपचारांत चालढकल, टाळाटाळ करत असेल त्यावर दंडाची तरतूद
स्वतंत्र आरोग्य कर
सध्याचा जीडीपीचा १ टक्के आरोग्यावरील खर्च वाढून ४ टक्क्यांवर जाणार. योजनेचा मोठा हिस्सा आरोग्य करातून जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन. यात सरकार एकूण जीडीपीच्या ४ % खर्च करणार. सध्याचे प्रमाण १ %पेक्षा कमी.