फाइल फोटो: धुक्यातून मार्ग काढताना रेल्वेनवी दिल्ली - भारतीय रेल्वेच्या 31 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी 2015 या काळात 30 ट्रेन धावणार नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. दाट धुक्याच्या शक्यतेमुळे या ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेल्या रेल्वे या उत्तर भारतातील आहेत. धुक्यामुळे 36 रेल्वेच्या संचलनावर 31 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या काळात प्रभाव पडणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-याने स्पष्ट केले. यापैकी 30 रेल्वे पुर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यातील 4 रेल्वे तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आल्या आहेत तर, 2 रेल्वे गाड्यांच्या रूटमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रद्द करण्यात आलेल्या रेल्वे पुढील प्रमाणे - डिब्रूगढ राजधानी, लुधियाना शताब्दी, मोगा शताब्दी, झारखंड संपर्क क्रांति, लिच्छवी एक्सप्रेस, गढवाल एक्सप्रेस, उज्जैनी एक्सप्रेस आणि महानंदा एक्सप्रेस यांचा सामावेश आहे.
(रद्द करण्यात आलेल्या रेल्वेची संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा) दरम्यान रेल्वेच्या अधिका-यांकडून प्रवाशांना 31 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या काळात रद्द करण्यात आलेल्या रेल्वेचे बुकिंग करु नये असे सांगण्यात आले आहे.