आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 300 Chinese Troops Intrude Into Indian Territory In Ladakh And Surround 100 Indian Troops

भारतीय हद्दीत घुसून 300 चीनी सैनिकांनी 100 भारतीय जवानांना बनविले \'बंदीवान\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौर्‍याच्या दोन दिवस आधी चीनच्या आर्मीने पुन्हा एकदा भारतासोबत आगळीक केली आहे. भारतीय सीमेत घुसून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) 300 सैनिकांनी 100 भारतीय जवानांना वेढा टाकला असून त्यांना परत जाण्यास बंदी घातली आहे. ही घटना लडाखच्या चुमूर भागात घडली आहे.
चीनी सैनिकांनी रविवारी देखील भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. चीनी सैनिक लडाखच्या देमचोक भागात 500 मीटर आत घुसले आणि त्यांनी तंबू ठोकले होते. या वर्षभरात चीनने ऑगस्टपर्यंत 334 वेळा भारतात घुसखोरी केली आहे.

सीमेवर तणाव वाढला
चीनकडून होणार्‍या घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सीमेवर तणाव वाढला आहे. चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांना थांबवून ठेवल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे, हे सर्व भारतीय हद्दीत होत आहे.
चीनला सीमाप्रश्न सोडवायचा नाही
माजी मुत्सद्दी रंजितसिंह काल्हा यांच्या दाव्यानुसार, चीनला सीमाप्रश्न सोडवायचाच नाही. ‘इंडिया-चीन बाउंड्री इश्यू : क्वेस्ट फॉर सेटलमेंट’ या पुस्तकात काल्हा यांनी म्हटले आहे की, घुसखोरीच्या माध्यमातून भारताला धमकावत राहणे हा चीनचा उद्देश आहे. काल्हा हे परराष्ट्र मंत्रालयात सचिव होते. त्यांनी 1985 ते 1988 पर्यंत सीमाप्रश्नी चर्चेसाठी नेमण्यात आलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व केले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, काय आहे सीमाप्रश्न?