आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 323 Old Laws Will Cancelled, Says Union Law Minister Ravishankar Prasad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील ३२३ जुने कायदे रद्द करणार, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकार देशातील कालबाह्य झालेले जुने कायदे रद्द करून त्या ठिकाणी प्रासंगिक उपाययोजना लागू करण्याच्या दृष्टीने वेगाने काम करत आहे. बदलावयाचे ३६ कायदे रद्द करणे किंवा त्यात बदलण्यासंबंधीचे विधेयक गेल्या सप्ताहात संसदेत सादर करण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनात आणखी २८७ कालबाह्य कायदे रद्द करण्यासंबंधीचे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लागू करण्यासाठी विधेयक आणले जाणार आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी ही माहिती दिली.

रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी सांगितले की, सरकारने रद्द होऊ शकणा-या जुन्या २८७ कायद्यांची वेगळी सूची तयार केली आहे. हे सर्व कायदे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रद्द केले जातील. पैकी ७२ कायदे तत्काळ रद्द केले जाण्याची गरज आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात संबंधित विभागांना पत्र लिहून त्यांचे मत मागवले आहे. प्रसाद यांनी सांगितले की, केंद्र सरकार ७०० गुंतवणूक विधेयक (अ‍ॅप्रोप्रिएशन अ‍ॅक्ट) रद्द करण्यासंदर्भातही विचार करत आहे. सरकारी तिजोरीतून रक्कम काढण्यासाठी दरवर्षी कमीत कमी १२ विधेयके आणावी लागतात. कायदा मंत्रालयाने यासंदर्भात अर्थ मंत्रालयाकडून त्यांचे मत
मागवले आहे. ते आल्यावर त्याबाबत निर्णय शक्य होईल.
पीएमओने बनवली स्वतंत्र समिती
प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयानेही एक स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ही समिती जुन्या कायद्यांची समीक्षा करून त्यांची सूची तयार करणार आहे. याआधी २००१ मध्ये सरकारने जुने कायदे रद्द करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करून त्यावर विचार सुरू केला होता.