आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: 33 कोटी लोक पाण्यासाठी त्रस्त, यांच्यापासून शिका पाणी बचत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सर्वाधिक तापमान 48.5 अंश सेल्सियस ओडिशाच्या टिटलागड येथे नोंदले गेले. (फाइल फोटो) - Divya Marathi
देशातील सर्वाधिक तापमान 48.5 अंश सेल्सियस ओडिशाच्या टिटलागड येथे नोंदले गेले. (फाइल फोटो)
नवी दिल्ली - एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उन्हाचा पारा चढला आहे. सर्वाधिक तापमान 48.5 अंश सेल्सियस ओडिशाच्या टिटलागड येथे नोंदले गेले. तापमानाने 17 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात याआधी 30 एप्रिल 1999 ला तापमान 48.1 अंशावर गेले होते. वाढत्या तापतमानाचा परिणाम यमुनेवरही दिसून येत आहे. हथिनीकुंड बैराज येथे यमुनाचा प्रवाह 13 वर्षांमध्ये सर्वाधिक घटला आणि 1064 क्यूसेकवर पोहोचला आहे.
ओडिशात उष्माघाताचे चार बळी
- देशातील तप्त वातावरणात दिल्लीकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. येथील तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा कमी राहिले.
- दक्षिण भारतातील चेन्नई, हैदराबादसह अनेक शहरांमध्ये पारा 40 अंशावर राहिला.
- हवामाना खात्याच्या माहितीनुसार, येत्या चार दिवसांमध्ये तापमानात अशीच वाढ दिसून येईल.
- तर, ओडिशामध्ये रविवारी चार जणांचा उष्माघाताने बळी घेतल्याची माहिती सरकारने दिली.
आसाममध्ये पुर परिस्थिती
- आसाममध्ये शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे चार जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे.
- राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार लखीमपूर, जोरहट, शिवसागर आणि कैरियाडो येथे 45 हजार लोकांवर पावसाचा परिणाम झाला आहे.
- 8 मजूर जतिंगा नदीत बेपत्ता झाल्याची माहिती आहे. त्यांची शोधमोहिम सुरु आहे.
- मुसळधार पावसामुळे 1018 हेक्टर शेतजमीनीवरील पीकांचे नुकसान झाले आहे.
- शिवसागर येथे बुढी दिहिंग आणि देसांग यो दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
- लष्कर, एनडीआरएफ, एडीआरएफचे पथक बचाव कार्य करत आहे.
- मुसळधार पावसामुळे नवी दिल्ली-सिलचर पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्स्प्रेस लुमडिंगजवळ रेल्वे रुळावरुन उतरली होती. यात जीवितहानीचे वृत्त नाही.
देशातील पाण्याची स्थिती
पाण्याचा वापर पाण्यासारखा केल्याचा हा परिणाम आहे. देशातील 12 राज्ये थेंब-थेंब पाण्यासाठी तरसत आहेत. देशातील एक चतुर्थांश म्हणजे 33 कोटी लोकसंख्येला दुष्काळाने कवेत घेतले आहे, असे केंद्र सरकारनेही मान्य केले आहे. पाणी संकटाची ही बोलकी छायाचित्रे गेल्या 20-22 दिवसांच्या कालावधीत देशभरातून जमा केली आहेत. त्याची ही वस्तुस्थितीे. आता पाणी हवे असल्यास आतापासून बचत करा...
पुढील स्लाइडमध्ये,
कोणत्या राज्यात काय स्थिती, पाहा पाणीबाणीची बोलकी चित्र...