आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: देशात रोज 33 शेतकरी संपवतात जीवनयात्रा; खते-बियाणे-पंपासह कृषि कंपन्यांची मात्र बक्कळ कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात रोज 33 शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतीशी संबंधीत व्यापारी, उद्योजकांची कमाई मात्र कोट्यवधींमध्ये होत आहे. - Divya Marathi
देशात रोज 33 शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतीशी संबंधीत व्यापारी, उद्योजकांची कमाई मात्र कोट्यवधींमध्ये होत आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे परसोना गाव. सोनेसिंह हे शेतकरी गृहस्थ आपल्या कुटुंबासह घराच्या चौकटीवर बसलेले आहेत. ४२ अंश तापमानात घाम पुसत सांगतात की, आता शेती करणे खूप कठीण झाले आहे. गेल्या १५ वर्षांपासून दर वेळी नुकसान होते. त्यामुळे कर्जाचा डोंगर आहे. अर्थात ही परिस्थिती एकट्या सोनेसिंह यांची नाही. परिस्थिती एवढी खराब आहे की गेल्या १० वर्षांत देशात ९० लाख शेतकरी कमी झाले आहेत आणि ३.८ कोटी शेतमजूर वाढले आहेत.

दुसरीकडे शेती आणि शेतीशी संबंधित धंद्यांत वेगाने वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी भलेही फायदा होत नसला तरी त्यांच्यामार्फत कमाई करणाऱ्या लोकांचा धंदा चांगला चालला आहे. देशात पंपसेट, स्प्रिंकलर, पाइप आणि केबलचा वार्षिक व्यापार सुमारे एक लाख कोटी रुपयांचा आहे. दरवर्षी शेतकऱ्यांची शेती करण्याची गुंतवणूक ७-८ टक्के वाढली आहे. या वर्षी गेल्या चार वर्षांच्या तुलनेत धान्य आणि डाळींच्या किमती सर्वात कमी आहेत. दुसरीकडे शेतीशी संबंधित कंपन्यांचा फायदा दरवर्षी कोट्यवधी रुपयांत आहे.
 
केंद्र सरकारने या वर्षी मेमध्ये सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, २०१३ या वर्षापासून दरवर्षी सरासरी १२ हजारपेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. म्हणजे दररोज सुमारे ३३ शेतकरी. शेतकऱ्यांच्या वाईट स्थितीवर बोलताना शेती तज्ज्ञ देवेंद्र शर्मा म्हणाले की, जर वाढलेला महागाई दर हटवला तर देशात गेल्या २५ वर्षांत शेतकऱ्यांना उत्पानातच तोटा झाला आहे. फिलिपाइन्स येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेच्या अभ्यासानुसार, आशियात धानावरील कीटकनाशकांचा वापर म्हणजे वेळ आणि श्रम यांची बरबादी आहे. तरीही धानात ४५ प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर भारतात केला जात आहे.शर्मा म्हणाले की, गव्हावरील कीटकनाशकांचा वापर ३०० टक्के वाढला आहे. खरे म्हणजे कीटकांचा प्रकोप फार नसल्याने गव्हाला त्याची गरज नाही. कारण त्यामुळे शेतकऱ्यांची गुंतवणूक वाढली आहे. आंध्र प्रदेशात ३६ लाख एकर क्षेत्रात शेतकरी कीटकनाशकांचा वापरच करत नाहीत. त्यामुळे उत्पादकता वाढली आहे, कीटकांची संख्या कमी झाली आहे, पर्यावरणही स्वच्छ झाले आहे. त्याचबरोबर आरोग्यावरील खर्च ४० टक्क्यांनी कमी झाला आहे. ही प्रणाली देशात लागू करण्याची गरज आहे.
 
खतांसाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा खूप मोठा भाग थेट कंपन्यांना जातो. दुसरीकडे बी-बियाणे, कीटकनाशके आणि शेती व्यवसायाशी संबंधित कंपन्याही सवलतींचा फायदाही घेतात. शेतकरी आणि शेतीसाठी बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जातही शेतकऱ्यांसोबत कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज सवलतीच्या दरातच दिले जाते.

माजी कृषी सचिव सिराज हुसैन यांच्या मते, दरवर्षी शेती करण्याची गुंतवणूक (इनपुट कॉस्ट) सात ते आठ टक्क्यांनी वाढत आहे. गहू आणि धानाच्या आधारभूत किमतीत गेल्या चार वर्षांत दरवर्षी थोडीच वाढ होत आहे. त्यामुळेही स्थिती खराब झाली आहे. शेतकऱ्यांना कर्ज तर मिळते, त्यामुळे ते महागडे साहित्य, खत- बियाणे खरेदी करू शकतात.
 
दुसरीकडे, प्राइसवॉटर हाऊस कूपर्सचे कृषी आणि नैसर्गिक संसाधनांचे संचालक अजय काकरा यांनी सांगितले की, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करणे सतत कठीण होत आहे. शेतकऱ्यांना वेळीच सिंचन सुविधा मिळाली तर उत्पादन २.५ पट होऊ शकते.
शेतकऱ्यांना शेतीसाठी खत, कीटकनाशके, ट्रॅक्टर्स यांचा वापर करणे आणि खरेदी करणे ही मजबुरी आहे. दुसरीकडे एक वस्तुस्थिती अशीही आहे की, ८५ टक्के शेतकऱ्यांना विम्याचा फायदाच मिळत नाही. त्याचबरोबर २००३ ते २०१३ पर्यंत शेती करण्याची गुंतवणूक ३.६ पट वाढली आहे.

अशी आहे शेतकऱ्यांची स्थिती
> 3.18 लाख शेतकऱ्यांनी १९९५ ते २०१५ च्या दरम्यान आत्महत्या केल्या. म्हणजे सरासरी दरवर्षी १५,९२६.४ शेतकरी. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागानुसार.
> 27.3 कोटी टन धान्याचे उत्पादन २०१६-१७ मध्ये होण्याचा अंदाज. हा आतापर्यंतचा सर्वोच्च. पण या वेळी किमती गेल्या चार वर्षांत सर्वात खालच्या स्तरावर आहे.
> 03 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ होईल जर सर्व राज्य सरकारांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यास. मेरिल लिंचनिसार ती रक्कम जीडीपीच्या २ टक्क्यांएवढी.
> 6426 रुपये आहे शेतकरी कुटुंबाचे सरासरी उत्पन्न. एनएसएसओनुसार मासिक खर्च ६२२३ रुपये आहे. त्यामुळे शेतीच्या गरजांसाठी तो कर्जावरच अवलंबून असतो.

पुढील स्‍लाइडवर वाचा, फक्त शेतीशी संंबंधित या व्यवसायांना झाला कोट्यवधींचा फायदा...
बातम्या आणखी आहेत...