आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 35 Jadavpur University Students Arrested For Protesting

लैंगिक शोषण प्रकरणी चौकशीची मागणी करणा-या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, 35 अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : विद्यार्थ्यांना हुसकावून लावताना पोलिस.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या जादवपूर विद्यापीठात एका मुलीच्या लैंगित शोषण प्रकरणी आंदोलन करणा-या 35 विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या मैत्रिणीवर झालेल्या अत्याचाराची नव्याने चौकशी करण्याची मागणी हे विद्यार्थी करत होते. विद्यार्थ्यांनी कुलगुरू अभिजित चक्रवर्ती आणि रजिस्ट्रारला घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत विद्यार्थ्यांना पळवून लावले. मंगळवारी रात्री दोन वाजता पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये विद्यार्थी धरणे देत होते. या विद्यार्थ्यांनी कँपसमध्ये तोडफोडही केली. रात्री दोनच्या सुमारास विद्यार्थ्यांना हटवण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या कारवाईत 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाई विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या गैरवर्तणुकीची तक्रारही केली आहे.
विद्यार्थ्यांची मागणी काय?
या प्रकरणाच्या चौकशीसाठी नव्याने समिती स्थापन करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठाने स्थापन केलेल्या चौकशी समितीमध्ये बाहेरील सदस्यांचा समावेश करावा आणि कुलगुरुंनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही सुरुच आहे. तर कुलगुरुंनी हा प्रकार म्हणजे अवमान असल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण चर्चेचे सोडवता येऊ शकते, असे कुलगुरुंचे म्हणणे आहे.

सरकारची विद्यार्थ्यांना विनंती
पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असणा-या ममता बॅनर्जी यांच्या सरकारनेही विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन लोकशाहीला धरून नसून, त्यांनी आंदोलन थांबवून अधिका-यांशी चर्चा करावी असे शिक्षणमंत्री पार्थो चटर्जी म्हणाले आहेत.

पुढे पाहा, विद्यार्थ्यांचे आंदोलन व पोलिस कारवाईचे PHOTO...
अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO...