आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3500 चाइल्ड पोर्नोग्राफी साइट्स ब्लॉक, CBSE शाळांमध्ये जॅमर लावण्याचा केंद्राचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रीम कोर्टात चाइल्ड पोर्नोग्राफीवर बंदीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. - Divya Marathi
सुप्रीम कोर्टात चाइल्ड पोर्नोग्राफीवर बंदीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने शुक्रवारी सुप्रीम कोर्टाला सांगितले की, चाइल्ड पोर्नोग्राफीला अटकाव करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. तसेच चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित 3500 वेबसाइट्सना मागच्या महिन्यात ब्लॉक करण्यात आले आहे.
-सीबीएसईला त्यांच्या शाळांमध्ये जॅमर बसवण्याविषयी विचार करण्यास केंद्राकडून सांगण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पोर्नोग्राफी साइट्सवर जाण्यापासून रोखता येईल, असे केंद्राचे म्हणणे आहे.
 
स्कूलबस मध्ये जॅमर लावणे शक्य नाही
- जस्टिस दीपक मिश्रा यांच्या तीन सदस्यीय न्यायपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
- सरकारतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी पिठापुढे युक्तिवाद केला की, आम्ही अशा उपाययोजना आणत आहोत, ज्यामुळे हे प्रकार पूर्णपणे बंद होतील.
- तथापि, त्यांनी स्कूलबसमध्ये जॅमर लावणे शक्य नसल्याचे सांगितले.
 
सरकार दोन दिवसांत देणार स्टेटस रिपोर्ट
- सरकारने कोर्टाला सांगितले की, चाइल्ड पार्नोग्राफीला अटकाव करण्यासाठी आमच्यातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा स्टेटस रिपोर्ट सादर केला जाईल.
- कोर्टाने केंद्राला दोन दिवसांच्या आत स्टेटस रिपोर्ट सादर करण्याविषयी सांगितले आहे.
- देशभरात चाइल्ड पोर्नोग्राफीवर बंदीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...