आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या तुलनेत ३६ टक्के जास्त मुली दत्तक, ‘कारा’चा नवा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण जास्त आहे. सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अॅथॉरिटी (कारा) च्या नव्या अहवालात ही बाब समोर आली आहे. ‘कारा’ नुसार २०१४- १५ मध्ये २३०० मुली तर १६८८ मुले दत्तक घेण्यात आली. म्हणजे मुलांच्या तुलनेत ३६% जास्त मुली दत्तक घेण्यात आल्या.

वडील एकटेच पालक (सिंगल फादर) असल्यास मुलगी दत्तक मिळणार नाही, अशी तरतूद असताना हे घडले. ‘कारा’चे संचालक वीरेंद्र मिश्रांनी सांगितले की, दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या वर्षी राज्यात ९४७ मुले दत्तक घेतली. दत्तक घेण्याचे नियम सोपे करण्यासाठी संसदेत ७ मे रोजी आणलेले अल्पवयीन मुले न्याय कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. सोमवारी किंवा मंगळवारी राज्यसभेत चर्चा होईल.

2014-15 : 2300 मुली दत्तक घेतल्या. मुलांची संख्या 1688
2013-14 : 2293 मुली आणि 631 मुले दत्तक घेण्यात आली.

सिंगल मदर : एक नव्हे, तीन मुली दत्तक घेतल्या, पण ३ वर्षे लागली
अभियंता मालिनी परमार २६ वर्षांच्या होत्या तेव्हा सुष्मिता सेनने मुलगी दत्तक घेतल्याची बातमी त्यांनी वाचली. मालिनी एक दिवस ध्यान करत होत्या. त्यांना वाटले जणूकाही आईच बोलावतेय. पण त्यांना एकाच वेळी दोन मुली दत्तक घ्यायच्या होत्या. कायदेशीर प्रक्रियेसाठी दोन वर्षे लागली. मालिनी म्हणतात, दोन्ही मुलींनी माझ्या आई, बहिणीसह नातेवाइकांचीही मने जिंकली.

सिंगल फादर : कायदा बदलला तर मीही एक मुलगी दत्तक घेईन
ज्योति स्वरूप गुप्ता एमटीएनएलमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. देशातील सिंगल फादरपैकी ज्योती एक आहेत. मुलगा दत्तक घेण्यासाठी आईची परवानगी घेण्यासाठी त्यांना पाच वर्षे लागली. मुलाच्या शोधात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशात गेले. ओडिशात अमितेश मिळाला. मुलगी दत्तक घ्यायचीय. मात्र कायद्यात बदल व्हावा, असे ज्योति स्वरूप यांना वाटते.