आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट: भारतातील 38.7टक्के मुलांची वाढ खुंटलेली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतात लहान मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत एक भीषण वास्तव समोर आले आहे. देशातील ३८.७ टक्के बालकांची उंची सरासरीपेक्षा कमी असून त्यांची वाढ खुंटलेली असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. कुपोषणाच्या या प्रकाराच्या बालकांच्या बाबतीत भारत सहारा वाळवंटीय देशांपेक्षा पुढे आहे.

नुकत्याच जारी झालेल्या जागतिक पोषण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, सर्वेक्षण करण्यात आलेल्या १३२ देशांत भारत तब्बल ११४ व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे जगाच्या तुलनेत भारतातील मुलांचे कुपोषण हे अत्याधिक प्रमाणात आहे. जगभरात उंची व प्रकृतीने खुरट्या मुलांचे सरासरी प्रमाण २३.८ टक्के आहे.

अहवालात म्हटले आहे की, भारतात खुरट्या मुलांच्या प्रमाणात घट होत असली तरी ती अत्यंत धीमी आहे. या गतीचा विचार करता भारत २०३० पर्यंत घाना वा टोगो या देशांच्या सध्याच्या स्थानापर्यंत पोहोचू शकतो.

अाधीच्या तुलनेत प्रमाण घटले
खुरट्या मुलांचे प्रमाण घटवण्याच्या बाबतीत गेल्या दहा वर्षांत त्याअाधीच्या दशकाच्या तुलनेत भारताने दुप्पट यश मिळवले आहे. भारतात जगातील एक तृतीयांशापेक्षा जास्त खुरटी मुले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या समस्येचे गांभीर्य स्पष्ट होते.

मधुमेहाचेही प्रमाण मोठे
अहवालानुसार, भारतातील ९.५% प्रौढ व्यक्ती मधुमेहाने पीडित आहेत. जगभरात हे प्रमाण ९% आहे. १९० देशांत भारत १०४ व्या स्थानी आहे.

हृदयरोगांमुळे अडचण
अहवालानुसार, घरातील एखाद्या सदस्याला असलेल्या हृदयविकारामुळे त्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा ३० टक्के हिस्सा उपचारांवरच खर्च होतो. १९९५ ते २००४ या कालावधीत हा खर्च तब्बल ५८ टक्क्यांनी वाढला. १९९५ मध्ये हा खर्च जवळपास २५ हजार रुपये होता.

चीन २६ व्या स्थानावर
सध्या चीन भारतापेक्षा १०६ स्थानांनी कमी म्हणजे २६ व्या क्रमांकावर आहे. घाना व टोगो अनुक्रमे ५२ व ८० व्या स्थानावर आहे. तथापि, सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारतासह इतर देश कुपोषणाविरुद्धचा लढा हळूहळू जिंकत आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)