आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात 383 पोलिस जवानांना वीरमरण, पोलिस स्मारक दिनावर बोलले IB संचालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभर विविध ठिकाणी ड्युटी बजावताना गेल्या वर्षभरात पोलिस आणि सरंक्षण दलाच्या 383 जवानांना वीरमरण आले आहे. यात बीएसएफच्या 56 आणि सीआरपीएफचे 49 आणि जम्मू-कश्मिर पोलिसांच्या 42 जवानांचा समावेश आहे. इंटेलिजेन्स ब्युरोचे (IB) संचालक राजीव जैन यांनी शनिवारी पोलिस स्मारक दिनानिमित्त ही माहिती जारी केली आहे. पोलिस स्मारक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही शहीदांना श्रद्धांजली अर्पित करून त्यांच्या बलिदानाची आठवण काढली.
 
 
>> जैन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सप्टेंबर 2016 ते ऑगस्ट 2017 पर्यंत आम्ही देशभर 383 पोलिस जवान गमावले आहेत. यात यूपी पोलिसांच्या 76, बीएसएफच्या 56, सीआरपीएफचे 49, जम्मू-कश्मिरचे 42, छत्तिसगडचे 23, पश्चिम बंगालचे 16, दिल्ली पोलिस आणि सीआयएसएफचे 13, बिहार आणि कर्नाटक पोलिसांचे प्रत्येकी 12-12 आणि आईटीबीपीच्या 11 जवानांचा समावेस आहे.
>> या सर्वांना सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबार, काश्मिरात दहशतवाद्यांसोबत चकमक आणि नक्षली कारवाया आणि इतर कायदा व सुव्यवस्थेच्या कामकाजावेळी वीरमरण आले आहे. 
>> 21 ऑक्टोबर 1959 रोजी चिनी सैनिकांनी फायरिंग केली होती. त्यामध्ये 10 पोलिस जवान शहीद झाले होते. यासोबत देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 34 हजार पोलिस जवानांच्या आठवणीत पोलिस स्मारक दिवस दरवर्षी पार पडतो. 
बातम्या आणखी आहेत...