आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओखी चक्रीवादळाचे देशभरात 39 बळी, 167 मच्छिमार बेपत्ता, 556 मच्छिमारांची केली सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तमिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टीपासून ते महाराष्ट्रापर्यंत धडकलेल्या ओखी चक्रिवादळाने देशभरात घातलेल्या तांडवात 39 जणांनी प्राण गमावले आहेत. तर देशभरातील 167 मच्छिमार अजूनही बेपत्ता आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिल्याचे पीटीआयने स्पष्ट केले आहे. 


गृहमंत्रालयाचे सहसचिव संजीव कुमार जिंदाल म्हणाले की, वादळाचा परिणाम हळू हळू कमी होत आहे. गुजरातमध्ये मतदान अगदी जवळ आलेले असले तरी येथे या वादळाचा काहीही परिणाम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकता केरळमध्ये आतापर्यंत 29 जणांनी प्राण गमावले आहेत तर तमिळनाडूमध्ये 10 जणांचा या चक्रिवादळात अंत झाला असल्याची माहिती मिळाली आहेत. तसेच तमिळनाडूचे 74 आणि केरळचे 93 मच्छिमार अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. आपत्ती व्यवस्थापन पतकाने एकूण 556 मच्छिमारांची सुटका केली असल्याची माहितीही मिळाली आहे. 

 

राज्य सरकार अजूनही ओखीचा प्रभाव असलेल्या गावांमधून माहिती मिळवत असून आणखी काही मच्छिमार अडकले आहेत का, याचा शोध घेतला आहे. तमिळनाडू आणि केरळचे एकूण 809 मच्छिमार हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचले आहेत. त्याठिकाणी त्यांना निवारा आणि जेवणाची सोय केली जात आहे. 

 

लक्षद्वीपमधील पर्यटक सुरक्षित..
लक्षद्वीपमध्ये भारतीय आणि विदेशी असे एकूण 33 पर्यटक सुरक्षित असल्याचीही माहिती आहे. नेव्ही आणि कोस्ट गार्डच्या मदतीने व्यापाऱ्यांच्या जहाजांनाही सुरक्षितपणे लक्षद्वीपमध्ये किनाऱ्यावर आणण्यात यश मिळाले आहे. खबरदारी म्हणून मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ओखी चक्रिवादळाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...