आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुजफ्फरनगर रेल्वे दुर्घटनेच्या चौकशीत पर्मनंट-वे विभाग दोषी, 4 अभियंते निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुजफ्फरनगर रेल्वे अपघाताच्या २४ तासांनंतर रेल्वेने आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. प्राथमिक चौकशीत पर्मनंट वे विभागाला दोषी ठरवले आहे. हा विभाग नियमित धावणाऱ्या रेल्वेच्या मार्गांवर नजर ठेवतो. विभागाचा १ कनिष्ठ अभियंता, १ वरिष्ठ सेक्शन अभियंता, १ सहायक अभियंता व १ वरिष्ठ विभागीय अभियंत्याला निलंबित करण्यात आले. अंतरिम चौकशी अहवालानुसार, रुळाची दुरुस्ती सुरू होती. हेक्सा ब्लेडने रूळ कापल्यामुळे नट-बोल्ट व फिश प्लेट रुळावर नव्हत्या. ५.४५ ला येथून रेल्वे गेली, ५.४७ ला अपघात घडला.

यूपीत आणखी दोन रेल्वे अपघात
शहाजहानपूरमध्ये मनुष्यरहित रेल्वे फाटकावर चंपारण्य सत्याग्रह एक्स्प्रेसने मिनीट्रकला उडवले. यात ट्रकचालक ठार झाला. दरम्यान, काजगंजमध्ये मालगाडीचा डबा रुळावरून घसरल्याने १०० मीटर रूळ उद््ध्वस्त झाला.
 
बातम्या आणखी आहेत...