आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Modi Cabinet Ministers Are Lightweight But Got Heavyweight Ministries

स्‍मृती इराणी आणि सदानंद गौडांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याचे आश्चर्य!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काही चेहरे असे आहेत, की त्यांना मंत्रिपद मिळाल्याने राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा सुरु झाली आहे. स्मृती इराणी यांच्याकडे मानव संसाधन मंत्रालय, सदानंद गौडांकडे रेल्वे मंत्रालय, राधा मोहन सिंह यांच्याकडे कृषीमंत्रालय तर अशोक गजपती राजू यांच्याकडे नागरी उड्डयन मंत्रालयाची धुरा सोपविण्‍यात आली आहे. केंद्रातील महत्त्वपूर्ण मंत्रालयांची जबाबदारी या चार मंत्र्यांकडे सोपवण्यात आलेल्या जनतेत आश्चर्यही व्यक्त होत आहे.

स्मृति इराणी आणि सदानंद गौडांसारख्या नेत्यांकडे महत्त्वाचे मंत्रालय देऊन त्यांची राजकीय प्रतिष्ठा वाढविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

राधा मोहन सिंह आणि अशोक गजपती राजू यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. मात्र, सदानंद गौडा दुसर्‍यांदा खासदार बनले आहेत तर स्मृति इराणी यांनी संसदेत पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. यापूर्वी स्मृति इराणींना 2011 मध्ये राज्यसभेवर पाठवण्यात आले होते.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, या चार नेत्यांना महत्त्वाची मंत्रिपदे देण्यात आल्याने जनतेत का आश्चर्य व्यक्त होत आहे.