आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Reacts Sharply To Fresh Pakistan Ceasefire Violation

पाकचा दगाफटका, पांढरे निशाण नंतर पुन्हा गोळीबार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(फोटो : शहीद राम गवारिया यांच्या पार्थिवाला मानवंदना देताना सैनिक)

जम्मू / नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या स्वागत करतानाच पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या. पाकने सांबा जिल्ह्यातील तसेच हिरानगरमधील १५ तपास छावण्यांवर गोळीबार केला. त्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात चार रेंजर्स गमावल्यानंतरही पाकने योग्य तो धडा घेतला नाही. मृत सैनिकांना ताब्यात घेण्यासाठी पांढरे निशाण फडकावून नंतर पुन्हा गोळीबार करण्याचा निर्लज्जपणा करण्यात आला. दरम्यान, बुधवारच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला.

वर्षभरात ५६२ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन : २००३मध्ये युद्धबंदीचा करार झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये पाककडून ५६२ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन झाले. आंतरराष्ट्रीय सीमेवर ४१० वेळा आणि नियंत्रण रेषेवर १५२ वेळा. यात जवानांसह १९ जणांचा मृत्यू झाला. १५० हून अधिक जखमी झाले.

घुसखोरीसाठी ५०-६० दहशतवादी तयार : बीएसएफमहानिरीक्षकांच्या मते, सीमेपलीकडून ५० ते ६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत आहेत. त्यांच्या मदतीसाठी पाक रेंजर्स गोळीबार करत आहेत. मात्र, बीएसएफच्या प्रत्युत्तरापुढे रेंजर्सला मागे हटावे लागेल. कोणत्याही हल्ल्यातून मार्ग काढण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

धडा घ्यायचाच नाही: मनोहर पर्रीकर
पाककडूनवारंवार होणाऱ्या युद्धबंदीच्या उल्लंघनावर प्रतिक्रिया देताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले, ‘भारताने दिलेल्या प्रत्युत्तरातून पाकला धडा घ्यायचा नाही, असे दिसत आहे.’ दरम्यान, बीएसएफचे आयजी राकेश शर्मा म्हणाले की, ‘नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी सहा वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता.

जवान समर्थ : गृहमंत्री
गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘भारताच्या सीमेकडे डोळे उघडून पाहण्याची हिंमत कुणी करणार नाही. कुणी असे केलेच तर आपले बीएसएफ आणि लष्कराचे जवान त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहेत. या लोकांना लवकरच समज येईल, असा मला विश्वास आहे.’

पुढे वाचा, अपहरण प्रकरणात झकी-उर-रहमान लख्वीला १४ दिवसांची कोठडी