आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 4 Year Old Girl Touched Inappropriately By Classmate In Delhi Case Registered News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजीतल्या मुलाने केला 4 वर्षीय चिमुकलीचा लैंगिक छळ, डॉक्टरांनी कन्फर्म केल्यावर FIR दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येथे द्वारकाच्या एका शाळेत 4 वर्षीय चिमुकलीला आक्षेपार्ह स्पर्श केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे कृत्य चिमुकलीसह शिकणाऱ्या एका मित्रानेच केले. पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.

 

चिमुकलीने प्रायव्हेट पार्ट दुखत असल्याची केली तक्रार
- वृत्तसंस्थेनुसार, ही घटना द्वारकामधील मॅक्सफोर्ट शाळेतील आहे. एफआयआरमध्ये पालकांनी सांगितले की, चिमुकलीने 17 नोव्हेंबरला शाळेतून आल्यानतर प्रायव्हेट पार्ट दुखत असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी फिजिकल असॉल्ट झाल्याचे म्हणाली.
- चिमुकलीने सांगितले की, जे काही झाले ते शाळेत असतानाच झाले. तिच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने चिमुकलीचे अंडरगारमेंट काढून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बोटाने स्पर्श केला. यामुळे चिमुकलीने मुलाला धक्काही दिला, पण तो बाजूला झाला नाही. आसपास कोणीही नव्हते, यामुळे ती कोणालाही मदतीसाठी बोलावू शकली नाही."

 

पालकांनी केले शाळेवर आरोप
- पालकांनी शाळा प्रशासन, शिक्षक, स्कूल कोऑर्डिनेटरवर बेजबाबदारपणाचा आरोप करून या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
- पालक असेही म्हणाले की, शाळेच्या प्रिन्सिपल्सनी कोणतीही मदत केली नाही.
- यानंतर पीडितेच्या आईवडिलांनी तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी सेक्शुअल असॉल्ट झाल्याचे कन्फर्म केले. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

 

पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमधून पाहा, हा धक्कादायक घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...