आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 40 Indians Kidnapping News In Marathi, Iraq, ISIS, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

40 भारतीय नागरिकांचा ठावठिकाणा लागला, सरकारशी चर्चेसाठी विशेष दूत रेड्डी पोहोचले इराकमध्‍ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुन्नी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी इराकी शिया तरुणींनीही शस्त्रास्त्रे उचलण्याची तयारी दर्शव - Divya Marathi
सुन्नी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी इराकी शिया तरुणींनीही शस्त्रास्त्रे उचलण्याची तयारी दर्शव
नवी दिल्ली - इराकच्या मोसूल शहरातून अपहरण झालेल्या 40 भारतीयांचा ठावठिकाणा लागला आहे. इराक सरकारने अपहृत भारतीयांबद्दल माहिती दिल्याचे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले, परंतु सरकारने नेमके ठिकाण सांगितले नाही. त्यानंतर अपहृतांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. ते कितपत सुरक्षित आहेत हे आताच सांगता येणार नाही असे सांगून अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने खंडणी मागितलेली नाही. दहशतवादी संघटना आयएसआयएसने भारतीयांचे अपहरण केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, विशेष दूत सुरेश रेड्डी बगदादला दाखल झाले आहेत. ते इराक सरकारशी चर्चा करत आहेत.

अपहृतांच्या कुटुबीयांनी गुरुवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. कुटुंबीयांसोबत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादलही होते. सुटकेसाठी प्रयत्न सुरू असून सर्व घडामोडींवर जातीने निगराणी करत असल्याचे स्वराज यांनी सांगितले. रस्त्यावर रक्तपात सुरू असल्याने इराकमधील असलेल्या सर्व भारतीयांना घराबाहेर पडू नये, असे सांगण्यात आले आहे. दोन-तीन दिवसांत परिस्थिती निवळल्यानंतर सर्वांना मायदेशी आणण्याचे काम सुरू होईल, असे स्वराज म्हणाल्या. अपहृत 40 भारतीयांमध्ये बहुतांश पंजाबचे रहिवासी आहेत. ते एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत कामाला होते.

अपहृतांच्या कुटुंबीयांची परराष्ट्रमंत्र्यांशी भेट
सुन्नी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी इराकी शिया तरुणींनीही शस्त्रास्त्रे उचलण्याची तयारी दर्शवली आहे. नजफ येथे रायफल्स घेऊन गुरुवारी घोषणा देताना.

इराकमध्ये 18000 भारतीय
इराकमध्ये 18 हजार भारतीय नागरिक असावेत असा ढोबळ अंदाज आहे. यापैकी शंभर ते दीडशे लोक इराकच्या संकटग्रस्त भागात अडकले आहेत. यामध्ये तिक्रीतमध्ये अडकलेल्या 46 परिचारिकांचाही समावेश आहे. दरम्यान, आणखी दहा भारतीय नागरिकांचे अपहरण झाले असून हे सर्व पुण्याचे रहिवासी आहेत, असा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे.

रस्त्यावर मृतदेहांचा खच
इराकहून परतलेल्या लोकांनी तेथील भीषण परिस्थिती सांगितली. रस्त्यारस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसतात. दहशतवादी बस थांबवतात आणि गाडीतून खाली उतरवून गोळ्या घालतात. वयाचा मुलाहिजा ठेवत नाहीत. सहा वर्षांचा असो की साठ, सगळ्यांना ठार करतात. इराकमध्ये प्रथमच असे घडत आहे, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

नजफमध्ये 230 भारतीय अडकले
इराकचे प्रमुख धार्मिक शहर नजफमध्ये 230 भारतीय अडकले आहेत. यापैकी बहुतांश उत्तर प्रदेशचे व काही पंजाब व हरियाणाचे लोक आहेत. यापैकी काही लोकांनी फोनवरून टी.व्ही.चॅनल्सवर आपली व्यथा सांगितली. कामाला असलेल्या कंपनीने त्यांना बसरा या सुरक्षित शहरात जाण्याचा सल्ला दिला आहे, परंतु हे शहर नजफपासून 800 किलोमीटर दूर आहे.