आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० लाख टन साखरेची निर्यात, शेतक-यांची १४३९८ कोटींची थकबाकी देण्यासाठी निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऊस उत्पादक शेतक-यांची १४३९८ कोटी रुपयांची थकबाकी देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा देशांतर्गत साठा कमी करून निर्यात वाढवण्याचा आणि पेट्रोलमध्ये जास्त प्रमाणात इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अन्न मंत्रालयाने ठेवलेल्या प्रस्तावांवर शनिवारी हे निर्णय घेण्यात आले. सरकारने १० जून रोजी साखर उद्योगासाठी ६,००० कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्याचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. देशातील ऊस उत्पादक शेतक-यांची सध्या साखर कारखान्यांकडे १४,३९८ कोटी रुपये थकबाकी आहे.
साखरेची उत्पादन किंमत प्रतिकिलो ३० रुपये असताना कारखान्यातील प्रतिकिलो किंमत २० रुपयेच आहे. सध्या देशात ४० लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा आहे. चार वर्षांपासून मागणीच्या तुलनेत उत्पादन जास्त आहे, त्यामुळे साखर कारखानदार अडचणीत आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे निर्णय झाले.

अन्न मंत्रालयाच्या सूचना
>४० लाख टन साखरेची निर्यात करावी. निर्यातीत साखर कारखान्यांचे नुकसान झाल्यास सरकारने नुकसान भरपाई द्यावी.
>पेट्रोलमध्ये सध्या ५ टक्के इथेनॉल मिसळण्यात येते. ते वाढवून ६ टक्के करावे.
>साखर कारखान्यात उसाच्या बगॅसपासून वीज उत्पादनाची क्षमता वाढवण्यात यावी.