आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० जणांकडून लोकशाहीची हत्या, लोकसभाध्यक्षांचा काँग्रेस खासदारांवर संताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेसच्या गोंधळामुळे मंगळवारीही लोकसभेचे कामकाज प्रभावित झाले. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कामकाज होऊ देणार नाही, या भूमिकेवर ठाम राहत फलक दाखवत प्रचंड घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस खासदारांवर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन भडकल्या. ही लोकशाही नव्हे, लोकशाहीची हत्या आहे. ४० जण ४४० सदस्यांचा हक्क हिरावून घेत आहेत. गोंधळ घालणाऱ्यांचे चेहरे टीव्हीवर दाखवा, अशा शब्दात त्यांनी उद्वेग व्यक्त केला.
लोकसभेत काँग्रेसने आयपीएल वादावर चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र लोकसभा अध्यक्षांनी तो फेटाळून लावला. त्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. हातात पोस्टर्स व बॅनर्स घेऊन काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना घेरले. आम्हाला बोलूही दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला. या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू होता.

दुपारच्या सत्रात उपाध्यक्ष थंबीदुराई अासनावर होते. काँग्रेस सदस्यांनी कागद फाडून त्याचे तुकडे त्यांच्या अंगावर भिरकावले. या गोंधळातच लोकसभेचे कामकाज सुरु राहिले. दुपारी चार वाजता सुमित्रा महाजन पुन्हा आसनावर आल्या तरीही गोंधळ सुरूच होता. दरम्यान, संसदेतील पेचप्रसंगाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अडेलतट्टूपणा जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी केला.