आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Emergency: जाणून घ्या, अखेर इंदिरा गांधींनी का लावली होती आणीबाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नुकतेच आणीबाणीसंबंधीचे वक्तव्य करुन सत्ताधार्‍यांसह विरोधकांमध्येही गोंधळ उडवून दिला. त्यांचे ते वक्तव्य द्विअर्थी असल्याचे म्हटले जात आहे, तर विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याला मुद्दा बनवत मोदी सरकारवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. देशात आणीबाणी लागायला येत्या 25 जून रोजी चार दशके पूर्ण होणार आहेत. त्यानिमीत्त divyamarathi.com आणीबाणीसंबंधीच्या घटनाक्रमाची आपल्या वाचकांना माहिती करुन देत आहे.
देशाच्या राजकीय व्यवस्थेत अजूनही आणीबाणी लागू होण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले होते. अडवाणी म्हणाले की, '' भविष्यात नागरी स्वातंत्र्यावर गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अडवाणी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले. सध्या घटनात्मक आणि कायद्याचे कवच असूनही लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या शक्तीही उपस्थित असल्याचे अडवाणी म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तूळात नव्या वादाला जन्मा दिला. त्यांनी हे विधान कोणाला उद्देशून केले हे मात्र त्यांनाच माहित. मात्र, त्यांच्या विधानावरुन विरोधक आणि सत्ताधारी दोघांनीही एकमेकांवर शाब्दिक हल्ले सुरु केले आहे.
त्यानंतर एका मुलाखतीमध्ये पुन्हा त्यांना आणीबाणीसंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्याचा संबंध काँग्रेससोबत जोडून गोलमाल उत्तर दिले. 1975 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती, तेव्हा अडवाणी बराचकाळ तुरुंगात होते. आणीबाणी दूर झाल्यानंतर जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले त्यात अडवाणी माहिती आणि प्रसारण मंत्री होते.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या आणीबाणीसंबंधीची सर्व माहिती ...
बातम्या आणखी आहेत...