आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंध्र-तेलंगणात उष्णतेच्या लाटेत आकापर्यंत ४३२ वर मृत्युमुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आंध्र आणि तेलंगणात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. येथे उष्णतेच्या तडाख्यात आजवर ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या आंध्र प्रदेशात १८ मेपासून २४६ जण मृत्युमुखी पडले. रविवारी दिवसभरात ८४ जणांचा मृत्यू झाला.
तेलंगणात शनिवारपासून ५८,तर एकूण १६२ जण दगावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. देशात सर्वाधिक ४७.७ अंश तापमान उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात नोंदले गेले. महाराष्ट्रात सर्वाधिक ४७ अंश तापमान चंद्रपूर जिल्ह्यात नवगामध्ये होते. राजस्थानातील जैसलमेर आणि श्रीगंगानगरमध्ये पारा ४५.६ अंशांवर पोहोचला होता.
बातम्या आणखी आहेत...