आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीनंतर 5,800 कंपनी खात्यात आले 4,574 कोटी; 4,552 कोटी लगेच काढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटाबंदीनंतर ५८०० बनावट कंपन्यांची माहिती सरकारच्या हाती आली असून या कंपन्यांच्या खात्यात त्या कालावधीत ४,५७४ कोटी रुपये जमा झाल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नव्हे, त्यापैकी ४५५२ कोटी रुपये लगेच काढण्यातही आले, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. १३ बँकांकडून ही माहिती सरकारला देण्यात आली. दरम्यान, सरकारने २.०९ लाख बनावट कंपन्यांची नोंदणी रद्द केली असून या कंपन्यांच्या बँक खात्यांतून पैसे काढण्यावर निर्बंध लावले आहेत. 

सरकारच्या हाती आलेल्या माहितीत एका कंपनीच्या नावे सर्वाधिक म्हणजे २,१३४ खाती, दुसऱ्या एका कंपनीची ९०० तर अन्य एका कंपनीची ३०० खाती स्पष्ट झाल्याचे निवेदनात नमूद आहे. ५,८०० कंपन्यांच्या १३,१४० खात्यांत व्यवहार झाला. कर्ज खाते वगळल्यास ८ नोव्हेंबर २०१६ रोजी या खात्यांत केवळ २२.०५ कोटी रुपये जमा होते. मात्र, नोटाबंदीच्या घोषणेनंतर नोंदणी रद्द होईपर्यंत या खात्यांत ४,५७३.८७ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. यानंतर ४,५५२ कोटी रुपये काढण्यात आले. कंपनीची नोंदणी रद्द झाल्यानंतरही काही खात्यांवर व्यवहार झाल्याचे उघडकीस येत आहे.
 
या केवळ २.५% कंपन्या
सरकारने आतापर्यंत जाहीर केलेल्या या कंपन्यांची आकडेवारी म्हणजे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे एक टोक असून एकूण संशयित कंपन्यांपैकी केवळ २.५% कंपन्यांचाच हा आकडा आहे. बँका लवकरच संशयित व्यवहार झालेल्या उर्वरित कंपन्यांच्या खात्यांची माहिती सरकारला देणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...