आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 47 Lack Crores Foods Spoiled Every Year In World

जगात दरवर्षी 47 लाख कोटींच्या अन्नाची नासाडी, अन्न व कृषी संघटनेचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगभरात दरवर्षी जवळपास 47.53 लाख कोटी रुपयांच्या अन्नाची नासाडी होते, असे संयुक्त राष्‍ट्र संघटनेच्या अन्न व कृषी संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. ‘फूड वेस्टेज फुटप्रिंट : इम्पॅक्ट ऑन रिसोर्सेस’ या नावाने हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.


अहवालात नासाडी टाळण्यासाठी अन्न पुरवठा साखळीत आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. अन्नाची नासाडी होत असल्याने हवा, पाणी, जमिनीवर त्याचा घातक परिणाम होत आहे. जगभरात दरवर्षी जितक्या अन्नाची नासाडी होते तितक्याच प्रमाणात पुन्हा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागतो. रशियातील वोल्गा नदीतून वर्षभरात जितके पाणी वाहून जाते तितके पाणी खराब अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी लागते. खराब अन्नातून 3.30 अब्ज टन कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर पडतो. संघटनेचे महासंचालक जोसी ग्राझियानो डिसिल्वा यांनी सांगितले की, जगभरात दरदिवशी 87 कोटी लोकांना उपाशीपोटी झोपावे लागते. अशा स्थितीत एकतृतीयांश भोजनसामग्री फेकून देणे योग्य नाही.


कुठे खराब होते अन्न ?
54%
उत्पादन, निवडणे, धान्यगोदामे आदी ठिकाणी
46%


साठवणूक, वितरण व ग्राहक पातळीवर
देशांची स्थिती : विकसनशील देशांत हे नुकसान धान्य उत्पादन आणि साठवणूक या काळात जास्त प्रमाणात होते. आशियात सर्वात जास्त खराब होते. विकसित देशांत ग्राहकांकडूनच सर्वाधिक अन्नपदार्थ खराब होतात.
अन्नसामग्रीही : भात खराब झाल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम हवा आणि जमिनीवर होतो. त्याचबरोबर मांस, फळे, भाज्या खराब होण्याचे प्रमाण आशिया, युरोप व दक्षिण अमेरिकेत जास्त आहे.